Home Video इंग्लंडच्या प्रतिष्ठित एफ.आर.सी.एस पदवीने डॉ. प्रतापसिंह वरूटे यांचा सन्मान

इंग्लंडच्या प्रतिष्ठित एफ.आर.सी.एस पदवीने डॉ. प्रतापसिंह वरूटे यांचा सन्मान

32 second read
0
0
32

no images were found

इंग्लंडच्या प्रतिष्ठित एफ.आर.सी.एस पदवीने

डॉ. प्रतापसिंह वरूटे यांचा सन्मान

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):-डी वाय पाटील मेडिकल कॉलेजच्या सर्जरी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रतापसिंह वरूटे यांना इंग्लंडस्थित रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स, ग्लासगोकडून  “एफ आर सी एस” (FRCS) या प्रतिष्ठित मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्सचे रजिस्ट्रार डॉ. अभय राणे यांच्याहस्ते  आग्रा येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ.  वरूटे यांना  हि पदवी प्रदान करण्यात आली. 

       रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन, ग्लासगो ही ४४७ वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था आहे.संस्थेमार्फत युकेमध्ये विविध विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री देण्याचे काम केले जाते. त्याचप्रमाणे जगभरामध्ये शैक्षणिक, रुग्णसेवा, संशोधन आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्यावतीने मानद “एफआरसीएस” (FRCS) ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. 

        डॉ. प्रतापसिंह वरूटे यांनी आजवर केलेली रुग्णसेवा व सामाजिक कार्याची दखल या संस्थेने घेतली आहे. नुकत्याच झालेल्या असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया (ए एस आय )च्या वार्षिक परिषदेत त्यांना ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी  डॉ.  वरूटे यांनी ए एस आय सचिव म्हणून मागील तीन वर्षात केलेल्या कार्याचाही गौरव करण्यात आला. 

        डॉ वरूटे यांनी आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये शल्यचिकित्सा, लॅप्रोस्कोपिक सर्जरीच्या माध्यमातून रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केलेले आहेत.  डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी अनेक गरीब रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत.

        ही मानद पदवी मिळाल्याबद्दल डॉ. प्रतापसिंह वरूटे यांचे डी. वाय. पाटील  एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार  सतेज पाटील, विश्वस्त व मा. आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश मुदगल, अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा, कुलसचिव डॉ.  व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव डॉ. संजय जाधव, मेडिकल सुप्रीटेंडेंट डॉ. वैशाली गायकवाड, डिपार्टमेंट ऑफ सर्जरीचे प्रमुख डॉ. शीतल मुरचीटे व त्यांचे सहकारी, तसेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. वैभव मुदाळे, सचिव डॉ. सागर कुरुणकर, खजानीस डॉ. अनिकेत पाटील व सर्व संचालक, कोल्हापूर सर्जिकल सोसायटी व महाराष्ट्र सर्जिकल सोसायटी चे सर्व सभासद, डॉ. आप्पासाहेब वरूटे मेमोरियल हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सौ. वसुंधरा वरूटे व त्यांचे सर्व सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …