
no images were found
राजर्षी शाहू विचार व प्रचार परीक्षा उत्साहात
कोल्हापूर ( प्रतिनिधी):- राजर्षी शाहू महाराजांचे जीवन व कार्य विदयार्थी दशेतच मुलांना समजावे यासाठी गेली 13 वर्षे शाहू छत्रपती फौंडेशन राजर्षी शाहू विचार व प्रचार परीक्षा आयोजित करीत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात जवळ पास 20 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली, या परीक्षेत 5000 विदयार्थी सहभागी झाले होते.
या संस्थेचे मार्गदर्शक ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार सर हे आहेत. या परीक्षेसाठी त्यांनी खास विदर्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे पुस्तक लिहिले आहे, ते पुस्तक मुलांना दिले जाते आणि त्या वर आधारित असलेली ही परीक्षा घेतली जाते.
या परीक्षेच्या संयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. जॉर्ज क्रूझ, सचिव जावेद मुल्ला, डॉ. एस. व्ही. पाटील, डी डी पाटील,नवाब शेख, सतीश बरगे, इम्रान मुजावर, महेश गुरव, सचिन यादव, गोरख तदुलकर, सईद मुल्ला आणि विजयश्री फौंडेशनच्या सर्व विद्यार्थ्यानी यात सहभाग घेऊन ही परीक्षा यशस्वी रित्या पार पाडली.