
no images were found
सोमवार ते मतदाना दिवशी सायंकाळ पर्यंत व मतमोजणी दिवशी मद्य विक्री दुकाने बंद
कोल्हापूर : महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ ची निवडणुक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी व मद्याचे वितरण, वाटप होऊ नये. याकरिता दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते १९ नोव्हेंबर २०२४ रोजी संपूर्ण दिवस व दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत व दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपूर्ण दिवस कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या घाऊक व किरकोळ मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या (एफएल-१, एफएल-२, सीएलएफएल/टिओडी-३, एफएल-३. एफएल/बिआर-२, सीएल-२, सीएल-३, फॉर्म ई, फॉर्म ई-२. एफएल-४) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पारीत केले आहेत.
तसेच जिल्हाधिकारी बेळगावी यांनी महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजलेपासुन दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत व दिनांक २२ नोव्हेंबर रोजी रात्री १२.०० वाजल्यापासुन ते दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या सीमेपासुन कर्नाटक राज्यामधील ५ कि. मी. हद्दीतील सर्व किरकोळ दारु विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पारीत केले आहेत. अवैध मद्य निर्मीती, वाहतुक व विक्री विरुध्द यापुढेही नियमीत कारवाई सुरु राहणार असुन कोठेही मद्याची साठवणुक किंवा वाहतुक किंवा वाटप,वितरण होत असल्याबाबत, कोणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे टोल फ्री क्रमांक, १८००२३३९९९९ या क्रमांकावर तात्काळ माहिती द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनिय ठेवण्यात यईल विधानसभा निवडणुक २०२४ भयमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडण्याकरिता अवैध मद्याची निर्मिती, वाहतुक व विक्री विरुध्द कार्यवाही करण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर या कार्यालयाकडुन एकुण ०९ विशेष भरारी पथके तयार करण्यात आलेली आहेत तसेच ०४ अंतरराज्य व ०४ अंतरजिल्हा सीमा तपासणी नाके निर्माण करण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या पथकांव्दारे अवैध मद्य निर्मीती, वाहतुक व विक्री विरुध्द विशेष मोहिम राबवून दिनांक १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२४ अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत एकुण २५३ गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये २४४ आरोपींना अटक करण्यात आली असुन एकुण ९६ लाख ८० हजार ३८६ रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच मद्याचे वितरण/वाटप होणार नाही. याबाबत दक्षता घेण्यात येत असुन सर्व प्रकारच्या मद्यविक्रीच्या दुकानांवर विशेष पाळत ठेवण्यात येत आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी दिली.