Home शासकीय आचारसंहितेचे उल्लंघन होतेय? मग, cVIGIL अॅपवर तक्रार करा १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय? मग, cVIGIL अॅपवर तक्रार करा १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद

16 second read
0
0
15

no images were found

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय? मग, cVIGIL अॅपवर तक्रार करा १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद

 

कोल्हापूर  : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने cVIGIL सिटीझन अॅप विकसित केले आहे. या अॅपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने cVIGIL अॅप विकसित केले आहे. या मोबाईल अॅपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या cVIGIL अॅपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. 

cVIGIL अॅप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकत्यांनी फक्त अॅप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. अॅप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे. 

वैशिष्ट्ये :- cVIGIL अॅप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो, वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो. 

वापर कसा करायचा :- एन्ड्राईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील अॅप स्टोर या अॅपमध्ये जावून सी व्हिजिल (cVIGIL) सर्च करा. त्यानंतर अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर अॅप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा. 

अचूक कृती व देखरेख : या अॅप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा cVIGIL अॅप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते. 

लाईव्ह फोटो, व्हिडिओ :- या अॅपच्या अचूकतेसाठी अॅपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हीडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण पथकांना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल. 

तातडीने होते कारवाई :- या अॅपवर तक्रार दाखल होताच निवडणूक यंत्रणा तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल. 

डाटा सुरक्षा :- या अॅपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

मतदार मदत क्रमांक 1950

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मतदान अधिक पारदर्शक आणि मुक्त वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा यासाठी त्यांना प्रोत्साहीत देखील करण्यात येत आहे. नागरिकांनी 1950 हा टोल फ्री नंबर डायल केल्यावर त्यांना मतदानाविषयी आवश्यक माहिती देण्यात येते. तसेच या क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या निवडणूक विषयक तक्रारींची दखल देखील तात्काळ घेण्यात येते. माहितीसाठी किंवा निवडणूक विषयक काही शंका असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांकाच्या सुविधेचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन 272-राधानगरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हरेश सुळ यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …