no images were found
‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर‘ने पूर्ण केले १००० एपिसोड्स!
डिसेंबर २०१९ मध्ये सुरू झालेली एण्ड टीव्हीवरील मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर‘ने नुकतेच १००० एपिसोड्सचा टप्पा गाठला आहे. मालिकेमधील प्रमुख पात्रं जसे भीमराव (अथर्व), रमाबाई (नारायणी महेश वर्णे), रामजी सकपाळ (जगन्नाथ निवंगुणे) आणि मीराबाई (फाल्गुनी दवे) यांच्यासह इतर कलाकार व टीमने मालिकेच्या सेटवर या यशस्वी कामगिरीला साजरे केले. भीमरावची भूमिका साकारणारा अथर्व म्हणाला, ”प्रत्येक सुवर्ण टप्पा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो, ज्यामधून आमच्या यशस्वी कामगिरीची पुष्टी मिळते. आज, आम्हाला मालिकेने संपादित केलेल्या विविध उपलब्धींचा अभिमान वाटतो. डॉ. आंबेडकरांची भूमिका साकारणे हा माझ्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे मला अमाप प्रेम, आदर आणि सन्मान मिळाला. हा प्रवास व्यक्तिश: व व्यावसायिकदृष्ट्या लाभदायी ठरला आहे. आम्ही मालिकेचे १००० एपिसोड्स पूर्ण होण्याच्या क्षणाला साजरे करत असताना मी हे यश मिळण्यास हातभार लागलेल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आमचा हा प्रवास पुढे देखील सुरू राहिल, जेथे आम्ही आगामी काळात नवीन मानकं स्थापित करू आणि अधिक मोठे यश संपादित करू.” रामजी सकपाळची भूमिका साकारणारे जगन्नाथ निवंगुणे म्हणाले, ”प्रत्येक नवीन सुवर्ण टप्पा संपादित होण्यासह आम्हा कलाकारांना मोठ्या यशाचा आनंद मिळतो, तसेच आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत असल्याची पुष्टी मिळते. आमच्या टीमला बाबासाहेबांची अविरत चिकाटी, सर्वसमावेशक दृष्टीकोन आणि निरंतर तत्त्वामधून प्रेरणा मिळाली आहे. बाबासाहेबांचे हे गुण संपूर्ण भारतातील नागरिकांशी संलग्न आहेत. बाबासाहेबांचे वडिल, महत्त्वाकांक्षी व दूरदर्शी मुलाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेले रामजी यांची भूमिका साकारताना मला अभिमान वाटतो. १००० एपिसोड्स पूर्ण होण्याचा क्षण आनंदोत्सव साजरा करण्यासारखा आहे आणि यामधून आम्हाला आमचा सर्वोत्तम अभिनय सादर करण्यास अधिक प्रेरणा मिळते.”
मीराबाई यांची भूमिका साकारणाऱ्या फाल्गुनी दवे म्हणाल्या, ”सुरूवातीपासून मालिकेच्या कलाकारांचा भाग असल्याने मी मालिकेने विविध सर्वोत्तम एपिसोड्स आणि प्रेक्षकांशी संलग्न होणाऱ्या लक्षवेधक कथानकासह केलेली प्रगती पाहिली आहे. मला या टीमचा भाग असण्याचा अभिमान वाटतो, आम्ही मोठे कुटुंब बनलो आहोत. १००० एपिसोड्सच्या या प्रवासामध्ये प्रत्येक क्षणामधून मालिकेसाठी आमचे एकत्र प्रयत्न व पॅशन दिसून येते. यामधून अनेक अद्भुत आठवणी निर्माण झाल्या आहेत आणि प्रेक्षकांना अनेक एपिसोड्समधून सर्वसमावेशक कथानक व लक्षवेधक पात्रं पाहायला मिळाली आहेत.” रमाबाई यांची भूमिका साकारणाऱ्या नारायणी महेश वर्णे म्हणाल्या, ”मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर‘सोबतचा अनुभव आनंददायी राहिला आहे आणि १००० एपिसोड्सचा टप्पा गाठण्यासह मला अधिक आनंद झाला आहे आणि अभिमान वाटत आहे. मी मालिकेच्या यशाप्रती योगदान दिलेले सर्व कलाकार व टीम, एण्ड टीव्ही टीम आणि प्रेक्षकांचे आभार मानते. रमाबाई यांची भूमिका साकारण्याचा प्रवास लाभदायी राहिला आहे आणि या भूमिकेला माझ्या अपेक्षांपेक्षाही अधिक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.” १००० एपिसोड्सच्या यशस्वी पूर्ततेबाबत मत व्यक्त करत एस बी फिल्म्झ येथील संचालक स्मृती सुशील कुमार शिंदे म्हणाल्या, ”१००० एपिसोड्सचा टप्पा गाठणे हे मोठे यश आहे. आमची क्रिएटिव्ह टीम, सर्व कलाकार व टीम आणि एण्ड टीव्ही टीमचे त्यांची अविरत समर्पितता व अथक मेहनतीसाठी अभिनंदन. प्रेक्षकांचे विशेष आभार, ज्यांनी सतत प्रेम व कौतुकाचा वर्षाव केला आहे, ज्यामधून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे.”