
no images were found
मालिका ‘अटल‘मध्ये प्रचिती अहिररावचा विमला बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत प्रवेश
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल‘ दिवंगत श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या बालपणीच्या न सांगण्यात आलेल्या कथांना सादर करण्यासाठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. मालिकेचे कथानक भारतातील ब्रिटीश वसाहतवादी राजवटीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि वाजपेयी यांच्या बालपणीच्या जीवनाला सादर करते, तसेच अशा घटना, विश्वास व आव्हानांवर प्रकाश टाकते, ज्यामुळे ते महान नेते ठरले. मालिकेमधील प्रबळ पात्रांनी देखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता, मालिका नवीन भूमिका विमला सादर करण्यास सज्ज आहे, ज्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची थोरली बहीण म्हणून त्यांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक यशस्वी मराठी नाटक व मालिकांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री प्रचिती अहिरराव यांना ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यासाठी निवडण्यात आले आहे. या भूमिकेबाबत सांगताना प्रचिती अहिरराव ऊर्फ विमला म्हणाल्या, ”विमला विवाहित आहे आणि अटलची थोरली बहीण आहे. तिला तिच्या भावाच्या (यंग अटल) विश्वासाचे महत्त्व समजते आणि ती नेहमी त्याला पाठिंबा देते.”
ही भूमिका साकारण्याबाबत आपला उत्साह व्यक्त करत प्रचिती अहिरराव म्हणाल्या, ”अटल यांची थोरली बहीण विमला बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारण्याची दिलेली संधी मोठा सन्मान आहे. मी या भूमिकेसाठी तयारी करण्याकरिता वर्कशॉपमध्ये गेले, जे अत्यंत उपयुक्त ठरले. संशोधक व दिग्दर्शकांनी मला विमला बिहारी वाजपेयी यांची भूमिका समजण्यास मार्गदर्शन केले. मला माझा सर्वोत्तम अभिनय सादर करण्यासह भूमिकेमध्ये सामावून जाण्यासाठी माझे शंभर टक्के योगदान द्यावे लागले आहे.” त्या पुढे म्हणाल्या, ”अशा प्रतिष्ठित टीमसोबत काम करणे म्हणजे स्वप्न सत्यात अवतरल्यासारखे आहे. मी माझा सर्वोत्तम अभिनय सादर करण्याप्रती कटिबद्ध आहे. माझ्या प्रवेशाच्या एपिसोडचे प्रोमो यापूर्वीच प्रसारित झाले आहेत आणि मला माझ्या मैत्रिणी व कुटुंबाकडून प्रशंसा मिळाली आहे. मी या भूमिकेसह दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्यास अत्यंत उत्सुक आहे.”