
no images were found
युवासेनेच्या वतीने “महापुरुष स्मारक स्वच्छता अभियान”
खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना कोल्हापूरच्या वतीने महापुरुष स्मारक स्वच्छता अभियान या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर शहरातील महापुरुषांच्या स्मारकाची स्वच्छता करण्यात येणार असून या उपक्रमाची सुरवात आज युवा सेनेच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांच्या शाहूनगर येथील पुतळ्याच्या स्वच्छते पासून करण्यात आली. या पुतळ्या भोवती साचलेली घाण, धूळ, तण तसेच वाढलेले गवत काढून टाकण्यात आले. तसेच संपूर्ण परिसर पाण्याने धुण्यात आला.
सदर उपक्रम प्रत्येक रविवारी राबवण्यात येणार असून या माध्यमातून महापुरुशांचे विचार जपण्याचा प्रयत्न आहे, तसेच या अभियानात कोल्हापूर शहरातील नागरिकांनी, सेवाभावी संस्थानी, युवक युवतीनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवासेना सचिव श्री. ऋतुराज क्षीरसागर यांनी केले.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, शिवसेना उपशहरप्रमुख अश्विन शेळके, मंदार तपकिरे, सुनील देशपांडे,युवा सेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद चव्हाण,जिल्हाप्रमुख ॲड. चेतन शिंदे,जिल्हा समन्वयक अविनाश कामते,जिल्हा सरचिटणीस कुणाल शिंदे, रोहित पवार,शहर प्रमुख विश्वदीप साळोखे, युवतीसेना शहरप्रमुख सौ.नम्रता भोसले,कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ युवा सेना अध्यक्ष शैलेश साळोखे, सरचिटणीस कपिल पोवार, अभिजीत कदम, विपुल भंडारे, शिवसेना विभागप्रमुख आकाश सांगावकर,ओंकार परमणे,आय. टी. सेना शहरप्रमुख सौरभ कुलकर्णी, युवतीसेना उपशहरप्रमुख निवेदिता तोरस्कर,तेजस्विनी घाडगे,युवासेना उपशहर प्रमुख शुभम ठोंबरे,विश्वजीत चव्हाण,शुभम शिंदे,अर्जुन बुचडे,रोहन शिंदे, विनायक गवळी आदिंसह भागातील मान्यवर, नागरिक,महानगरपालिका सफाई कर्मचारी,उपस्थित होते.