no images were found
राजेश क्षीरसागर यांच्या हायटेक प्रचार यंत्रणा सज्ज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर रिंगणात उतरले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळी राजेश क्षीरसागर निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता यावी यासाठी राज्यभरातील महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटले आहेत.
गेल्या तीन निवडणुकांचा पूर्वानुभव पाहता क्षीरसागर यांनी यावेळीही प्रचारासाठी हायटेक यंत्रणा सज्ज केली आहे. यामध्ये एल.ई.व्हॅन, रिक्षा आदीसह विभागवार सुमारे २५ प्रचार फेऱ्या, ४५ कोपरा सभा, मुख्य ५ सभा याद्वारे शिवसेनेचे भगवे वादळ शहरात घोंगावणार आहे. यामध्ये महायुतीचे सर्वच नेते, पदाधिकारी यांचा सहभाग असणार आहे. यासह क्षीरसागर यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारात उतरले असून, वैयक्तिक भेटी गाटी, तालीम संस्था मंडळांना भेटीच्या माध्यमातून घरोघरी प्रचारास गती घेतली आहे.
राजेश क्षीरसागर यांच्या हायटेक प्रचार यंत्रणेचा उद्या शुभारंभ होणार असून, उद्या मंगळवार दि.०५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता “कोटीतीर्थ तलाव, कोल्हापूर” येथून प्रचारास शुभारंभ होणार आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. यानंतर कोटीतीर्थ तलाव येथून प्रचार फेरीस शुभारंभ होणार आहे. ही फेरी शाहू मिल – मातंग वसाहत – पिंपळेश्वर मंदिर – पांजरपोळ रोड – शिवाजी तालीम मार्गे राजारामपुरी भाजी मंडई येथे समाप्त करण्यात येणार आहे.