no images were found
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतंर्गत “निक्षय दिवा’ स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर: राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतंर्गत राज्यस्तरावर दिवाळी निमित्त “निक्षय दिवा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत टीबी जनजागृतीच्या नाविन्यपूर्ण व क्रिएटिव्ह पोस्ट व रील्स तयार करुन त्या सोशल मीडीयावर पोस्ट /शेअर कराव्यात, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी केले आहे.
स्पर्धेसाठीच्या सूचना खालील प्रमाणे-
निक्षय दिवा स्पर्धेत ऐच्छिक सहभाग आहे, एका तालुक्यातून एकापेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होऊ शकतात,
एनटीईपी कार्यालयातील किंवा कार्यालयाबाहेरील इच्छुकही स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. विजेत्यांना संबंधित जिल्ह्यांकडून सन्मानित केले जाईल. सोशल मिडीयावर पोहोच वाढविण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालायाच्या अकांऊटला टॅग करावे.
पोस्ट, रील तयार करुन शेअर केल्यानंतर, लिंकचा तपशील असेल तो ntep.acsm.mh@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावा. सूचना एक साधे परंतु सर्जनशील (क्रिएटिव्ह) दिवाळी शुभेच्छा संदेश तयार करुन शेअर करु शकता. त्यामध्ये टीबी संदर्भातील कॅप्शन बीमसह दिवाळी फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. एक साधी आयईसी रील किंवा पोस्ट डिझाइन करु शकतात. चांगले काहीही नाविन्यपूर्ण व सर्जनशील करण्यासाठी सर्वांना मोकळीक आहे. परीक्षक गट 1 (विषयावर आधारित) आणि गट 2 (YouTube/Instagram/Facebook/X) वर मिळालेल्या लाइक्सवर आधारित असेल. दोन्ही गटांमध्ये सर्वोच्च 3 स्पर्धकांना पुरस्कार दिले जातील. आपल्या आधिनस्त संस्था, कर्मचारी यांना या स्पर्धेबाबत सूचित करावे, असे आवाहनही डॉ. वेदक यांनी केले आहे.
स्पर्धेसाठी लिंक पुढीलप्रमाणे-
1)FACEBOOK PAGE
Link- https://www.facebook.com/TBMuktBharatKolhapur
2)X (Former Twitter)
Link- https://x.com/dtckolhapur
3)INSTAGRAM
Link –https://www.threads.net/@tbmuktbharat_kolhapur
4)YOUTUBE CHANNEL
Link- https://youtube.com/@districttuberculosisoffice5228?si=t71S66m1BT_91eKi