Home स्पोर्ट्स कोल्हापूरचा आदित्य सावळकर विजेता तर सोहम खासबारदार उपविजेता 

कोल्हापूरचा आदित्य सावळकर विजेता तर सोहम खासबारदार उपविजेता 

6 second read
0
0
86

no images were found

कोल्हापूरचा आदित्य सावळकर विजेता तर सोहम खासबारदार उपविजेता 

 

 कोल्हापूर (प्रतिनिधी):-संभवनाथ श्वेतांबर जैन मंदिर संघाचे मरुधर भवन, गुजरी, महाद्वार रोड कोल्हापूर येथे स्वर्गीय पोपटबाई सोनमलजी निम्बजिया यांच्या प्रथमस्मृति दिनानिमित्त नवकार चेस फाउंडेशनने आयोजित केलेल्या माॅं चषक भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न झाल्या.

स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर आठ गुणासह आघाडीवर असलेल्या  द्वितीय मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकरने सहाव्या मानांकित सांगलीच्या विक्रमादित्य चव्हाणचा पराभव करून नऊ पैकी नऊ गुणासह निर्विवादपणे स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. आदित्यला रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. दुसऱ्या पटावर तृतीय मानांकित मिरजेच्या मुद्दस्सर पटेल व पाचवा मानांकित साताऱ्याचा ओंकार कडव यांच्यातील अटीतटीच्या लढतीत मुद्दसरने बाजी मारत ओंकारला पराभूत केले तर तिसऱ्या पटावर आठवा मानांकित कोल्हापूरचा सोहम खासबारदारने सातवा मानांकित कोल्हापूरच्या संतोष कांबळे चा पराभव केला. सोहम व मुदस्सर चे समान आठ गुण झाल्यामुळे सरस बखोल्झ टायब्रेक गुणानुसार (52.5) सोहम खासबारदारला उपविजेतेपद मिळाले तर मुद्दस्सर पटेलला कमी (51)बखोल्झ गुणामुळे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नववा मानांकित कोल्हापूरचा प्रणव पाटील व पंधरावा मानांकित रत्नागिरीचा यश गोगटे या दोघांनी समान साडेसात गुणासह अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला. 

 संघवी शा. सोनमल वरदाजी, रूपाजी चॅरिटेबल ट्रस्ट ने या स्पर्धा पुरस्कृत केल्या होत्या. स्पर्धेचा बक्षीस समारंभ महेंद्र ज्वेलर्स परिवाराचे नारंगी ओसवाल, इंदुमती ओसवाल, चंद्रिका ओसवाल, रेखा ओसवाल, आरव ओसवाल, डॉक्टर ज्योती ओसवाल, स्वरा ओसवाल, तत्व ओसवाल, रिंकू गुंदेशा, प्रार्थना संघवी   व नवकार चेस फाउंडेशनचे डायरेक्टर रवी आंबेकर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, चेस असोसिएशन कोल्हापूरचे सचिव व स्पर्धेचे मुख्य पंच मनीष मारुलकर यांच्या हस्ते झाला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आरती मोदी,करण परीट, अर्पिता दिवाण,विजय सलगर,अमित दिवाण,उमेश कांबळे,प्रशांत जाधव व सर्वेश सुतार  यांनी कठोर परिश्रम घेतले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…