no images were found
महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा जोरदार प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल
कोल्हापूर( प्रतिनिधी) : -कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज जोरदार प्रदर्शन करत दाखल केला. हजारो कार्यकर्ते हातामध्ये भगवे ध्वज घेऊन भगव्या टोप्या परिधान करून मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते, कार्यकर्ते धनुष्यबाणाचे फलक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , राजेश क्षीरसागर यांच्या प्रतिमा, महायुतीतील सहयोगी पक्षाचे ध्वज घेऊन पारंपारिक वाद्यासह जल्लोषी वातावरणामध्ये सहभागी झाले होते.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले उमेदवारीवरून काँग्रेसचा विस्कळीतपणा आता चव्हाट्यावर आला आहे. यातून काँग्रेसमध्ये हुकूमशाही दिसून येते. मात्र ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा विचार केला त्यावेळी त्यांच्या पाठीमागे प्रथम राजेश क्षीरसागर उभे होते. उमेदवारी मागणारे अनेक होते पण त्यांना प्रामाणिकपणाचे निष्ठेचे फळ उमेदवारीतून मिळाले आहे. मात्र काँग्रेसमध्ये अनेक निष्ठावंत यांना डावलून विद्यमान आमदारांना डावलून असा उमेदवार दिलाय त्यास विरोध होत आहे ज्यावेळी काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला त्याचवेळी राजेश शिरसागर यांना गुलाल लागलेला आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र गाफील न राहता सर्वांनी राजेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी काम करायचे आहे.
खासदार धैर्यशील माने म्हणाले आमदार नसतानाही मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून कोल्हापूरमध्ये विकासात्मक कामे करण्याचे काम राजेश क्षीरसागर यांनी केले आहे यामुळे महायुतीचे सरकार आणण्यासाठी राजेश क्षीरसागर यांना विजय करावे असे आवाहन त्यांनी केले.
महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर म्हणाले मला महायुतीचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिली आहे. त्यांचे मी आभार मानतो. या पाच वर्षांपूर्वी निवडणुकीमध्ये काँग्रेसने खोटं नॅरेटिव्ह सेट केल्यामुळे आपला पराभव झाला पण पाच वर्षे आपण समाजासाठी काम करत असून मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी आपण आणू शकलो. सर्वसामान्यांची कामे या ठिकाणी केली आहेत. कार्यकर्त्यांनी आपण उमेदवार आहे. असे समजून या निवडणुकीत काम करावे असे आवाहन त्यांनी केले
यावेळी संपर्क निरीक्षक उदय सावंत, खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, शिवसेनेचे शिवाजी जाधव, महादेव यादव आरपीआयचे उत्तम कांबळे दत्ता मिसाळ, सोमनाथ घोडेराव यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते महिला सहभागी झाल्या होत्या.