Home राजकीय नारायण राणेंची शंकराचार्यांबद्दलची भूमिका भाजपला मान्य आहे का ?

नारायण राणेंची शंकराचार्यांबद्दलची भूमिका भाजपला मान्य आहे का ?

1 second read
0
0
19

no images were found

नारायण राणेंची शंकराचार्यांबद्दलची भूमिका भाजपला मान्य आहे का ?

आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या व हिंदूधर्माचे धर्मपीठ असणाऱ्या धर्मगुरू असणाऱ्या चार पिठाधीश शंकराचार्यांनी निव्वळ पौष महिना असल्याने सदरच्या राम मंदिराच्या उद्घटनाला तात्विक आणि धार्मिक प्रथेनुसार विरोध केला असता निव्वळ राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून निवडणुकांसाठी राम सातत्याने आठवणार्‍या भाजपने याचा शिलान्यास उरकू नये यासाठी शंकराचार्याने या मंदिराचं विधीवत पूजन रामनवमीच्या पवित्र दिवशी यथोचित व्हावं ही भूमिका आणि दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवण्यास नकार दिला….. अर्थात या शंकराचार्यांच्या धर्माचरणाच्या निर्णयास अनेक भक्तांनी त्यांच्या त्यांच्या पांडित्यनुसार विरोध दर्शवला.. त्याचबरोबर शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं ?? असा एक जावई शोध नामदार नारायण राणे यांनी लावला ..खरंतर अनेक पक्षांचे दरवाजे ठोठावत पुरोगामी ते प्रतिगामी असा प्रवास करत शेवटी भाजपवासी झालेले रा स्व संघाचे जेष्ठ कार्यकर्ते असणाऱ्या नारायण राणे यांनी व त्यांच्या वारसांनी सध्या हिंदू धर्माच्या विषयी बोलण्याची मक्तेदारी आपल्यालाच अशी भूमिका निभावत शंकराचार्यांच्या धर्माच्या योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित केला.. वस्तूता प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक विषयामध्ये आपला टाळा फासटणाऱ्या भाजपच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या कुठल्याही राजकीय नेत्यांनी या संदर्भामध्ये चकार शब्दही उद्गारलेला नाही.. खरंतर धर्म, संस्कार आणी हिंदूत्व याविषयी सातत्याने आपलीच मक्तेदारी असल्याची भूमिका बजावत असणाऱ्या भाजपन याबाबतीत बाळगलेलं मौन हे आश्चर्यकारक आहे ..खरं तर धर्मापीठाबद्दल अपमानकारक वक्तव्य करणे तसेच छत्रपती शिवरायांच्या बद्दल सुद्धा अपमानास्पद वक्तव्य करण्याची मालिका भाजपच्या नेत्यांच्या कडून सातत्याने घडत असताना या संदर्भामध्ये सतत डोळेझाक करण्याची भूमिका भाजपच्या नेतृत्वाने घेतली.. खरंतर नारायण राणेंच्या या भूमिकी विषयी पक्षाने आपली भूमिका त्वरित स्पष्ट करणे गरजेचे आहे.. खरंतर श्री राणेंच्या या धर्मपिठाच्या अपमानाबद्दल जर भाजप सोयीस्कर मौन बाळगत असेल तर तो भाजपने केलेला हिंदू धर्मियांचा अपमानच आहे .राममंदीराचा विषय निखळ निवडणुकीसाठी डोळासमोर ठेवून गाजावाजा करणे व राष्ट्रपुरुषाच्या अवमानांच्या बरोबरच धर्मपिठाचा अपमान करणे ही सातत्याने परंपरा जर भाजपचे नेते चालवणार असतील तर जनता याचा चोख उत्तर द्यायला उत्सुक आहे.. खरंतर श्री राणे यांनी केलेल्या विधानाबद्दलचं योग्य ते समर्पक उत्तर भाजपच्या लोकांनी द्यावं अन्यथा भाजपचा हा छत्रपती शिवराय यांच्या बद्दलचा तसेच धर्मपिठाबद्दलचा केवळ पोकळ अभिमान हिंदूत्वाचा बेगडी प्रेम व भामटा धर्माभिमानी लोकांसमोर आल्याशिवाय राहणार नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…