
no images were found
टोयोटा किर्लोस्कर मोटरतर्फे ऑल न्यू मॅन्युअल ट्रान्समिशन लेजेंडर ४X४ सादर
• प्रतिष्ठेचा आणि दमदार कामगिरीचा मिलाफ असलेली लेजेंडर लक्झरी आणि परफॉर्मन्स यांचे उत्कृष्ट संयोजन करत प्रीमियम एसयूव्ही श्रेणीमध्ये एसयूव्हीच्या नव्या व्याख्येची परिभाषा
• परफॉर्मन्सप्रेमींसाठी डिझाइन केलेल्या लेजेंडरमध्ये आहे २.८ लिटर डिझेल इंजिन, २०४ पीएस पॉवर आणि ४२० एनएम टॉर्क
• अधिक रोमांचक ड्रायव्हिंग अनुभवासाठी आणि संपूर्ण नियंत्रणासाठी ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत सुसज्ज
• कॅटामारन-इंस्पायर्ड- डिझाइन — बोल्ड फ्रंट आणि रिअर बंपर, स्लीक पियानो ब्लॅक ग्रिल आणि सिग्नेचर एलईडी लाईटिंग.
• रंग: पर्ल व्हाईट विथ ब्लॅक रूफ (ड्युअल टोन)
• एक्स-शोरूम किंमत: ४६,३६,०००
बंगळुरू, : वाढत्या स्टायलिश, साहसी आणि उच्च-कार्यक्षम एसयूव्हीच्या मागणीला प्रतिसाद देत, टोयोटा किर्लोस्कर मोटर अर्थात टीकेएम ने आज टोयोटा लेजेंडर ४X४ मॅन्युअल ट्रान्समिशन असलेली एसयूव्ही सादर केली आहे. थ्रिल-प्रेमी ड्रायव्हर्ससाठी डिझाइन करण्यात आलेली ही नवी एसयूव्हीची श्रेणी पॉवर, लक्झरी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे परिपूर्ण मिश्रण सादर करते.
२०२१ मध्ये भारतीय बाजारात पदार्पण केल्यापासून लेजेंडर एसयूव्हीने आपल्या ४X४ क्षमतांमुळे ऑफ-रोड सफारींसाठी परिपूर्ण साथीदार म्हणून ओळख मिळवली आहे. या एसयूव्हीमध्ये अतुलनीय ताकद देणारे शक्तिशाली २.८ लिटरचे डिझेल इंजिन असून , ती २४० पीएसची पॉवर आणि ४२० एनएम टॉर्क निर्माण करते ज्यामुळे वाहनचालकास आपल्या वाहनावर संपूर्ण नियंत्रण मिळते. यातील ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमुळे अचूकता वाढते आणि रोमांचक प्रवासाचा आनंद मिळतो. टोयोटाची प्रगत ४X४ तंत्रज्ञान प्रणाली कोणत्याही प्रकारच्या भूप्रदेशावर सहज वाहन चालविण्याची क्षमता प्रदान करते, ज्यामुळे ही एसयूव्ही शहरांतर्गत प्रवास आणि ऑफ रोड सफारीसाठी एक आदर्श साथीदार बनते.
लेजेंडर ४X४ एमटीच्या लॉन्चबद्दल बोलताना, टोयोटाच्या विक्री-सेवा-वापरलेल्या कार व्यवसाय विभागाचे उपाध्यक्ष श्री. वरिंदर वाधवा म्हणाले, “आम्ही टोयोटा लेजेंडरच्या नवीन नवीन श्रेणीचे अनावरण करताना उत्साही आहोत, जे आमच्या ग्राहकांच्या वाढत्या मागण्या आणि पसंती लक्षात घेऊन खास डिझाइन केले आहे. एमटी व्हेरिएंटच्या या नव्या श्रेणीमुळे लेजेंडरची आकर्षकता वाढेलच, शिवाय टोयोटाचे ग्राहकांच्या गतिशील गरजा पूर्ण करण्यासाठी बहुपर्यायी उपाय प्रदान करण्याचे वचनही दृढ होईल. आम्हाला विश्वास आहे की, भारतीय ग्राहकांच्या अपेक्षांनुसार अधिक डायनॅमिक आणि रोमांचक प्रवास अनुभव देताना, आम्ही प्रीमियम एसयूव्ही उत्कृष्टतेच्या मर्यादा पुढे नेत आहोत.”
डिझाइन फिलॉसॉफी ही भविष्यकालीन सौंदर्यशास्त्र आणि डायनॅमिक रोड प्रेझेन्सचे उत्कृष्ट संयोजन आहे. कॅटामारन-इंस्पायर्ड फ्रंट आणि रिअर बंपर्स तसेच पियानो ब्लॅक ऍक्सेंटसह परिपूर्ण असलेले धारदार आणि स्लीक फ्रंट ग्रिल, आकर्षक आणि अत्याधुनिक लुक प्रदान करतात. स्प्लिट क्वाड-एलईडी हेडलॅम्प्स व वॉटरफॉल एलईडी लाईन गाइड गाडी चालविताना चांगली दृश्यमानता प्रदान करते, तर सीक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स एसयूव्हीच्या आधुनिक आणि गतिशील आकर्षणात भर घालतात. १८-इंचाच्या मल्टी-लेयर्ड मशीन-कट फिनिश अलॉय व्हील्समुळे लेजेंडर एमटी मजबूत आणि प्रभावशाली रोड प्रेझेन्स दर्शवते. याचे केबिन डिझाइन लक्झरी आणि स्पोर्टी लुकचा उत्तम मिलाफ दर्शवतो. ड्युअल-टोन (ब्लॅक आणि मॅरून) इंटीरियर थीममध्ये स्टीयरिंग व्हील आणि कन्सोल बॉक्सवर कॉन्ट्रास्ट स्टिचिंगसह उत्कृष्ट टच दिला गेलेला आहे. इन्स्ट्रुमेंट पॅनेल, फ्रंट डोअर ट्रिम आणि फुटवेल एरियामध्ये असलेली एम्बियंट इल्युमिनेशन लाईटिंग तुमचा प्रीमियम अनुभव वाढवते, ज्यामुळे प्रत्येक प्रवास अधिक आकर्षक आणि सुखद होतो.
११ जेबीएल प्रीमियम स्पीकर्स (सबवूफर आणि अॅम्प्लिफायरसह) इमर्सिव साउंडचा अनुभव प्रदान करतात, ज्यामुळे लांब प्रवास अधिक आनंददायक होतो.
समोरच्या आसनांसाठी देण्यात आलेली सक्शन-बेस्ड सीट वेंटिलेशन सिस्टम तीव्र हवामानाच्या परिस्थितीतही जास्तीत जास्त आराम सुनिश्चित करते.