
no images were found
वसंतराव मुळीक उद्या दाखल करणार अर्ज
कोल्हापूर (प्रतिनिधी):- अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मात्र, वेळेचे कारण देत उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संपत खिलारी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज नाकारल्याची तक्रार मुळीक यांनी केली. दरम्यान याबाबत बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी खिलारी यांनी, वसंतराव मुळीक यांनी दोन वाजून पन्नास मिनीटांनी दालनात प्रवेश केल्याचं सांगितलं. मात्र त्यांच्या, अर्जासोबत काही कागदपत्रे पूर्ण नसल्याने आपण उमेदवारी अर्ज स्वीकारला नसल्याचा खुलासा खिलारी यांनी केलाय. निवडणूक निर्णय अधिकारी खिलारी यांच्या कामकाजाबाबत मुळीक यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केलीय. दरम्यान मुळीक उद्या मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.