Home देश-विदेश बांगलादेशाची चूक भारताच्या पथ्यावर ?

बांगलादेशाची चूक भारताच्या पथ्यावर ?

10 second read
0
0
17

no images were found

बांगलादेशाची चूक भारताच्या पथ्यावर ?

         बंगालादेशातील परिस्थितीमुळे गेल्या वर्षी भारताने अमेरिकेला 4.6 अब्ज डॉलरचे कपडे निर्यात केले होते. म्हणजे अमेरिका भारतीय कपड्यांचा सर्वात मोठी खरेदीदार झाला आहे. बंगालादेशातील अस्थिरतेचा सर्वाधिक फायदा व्हिएतनामला झाला आहे. बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारताला फायदा बांगलादेशात सुरु असलेल्या राजकीय अस्थिर परिस्थितीचा फायदा भारताला होत आहे. अमेरिका आता कपडे खरेदीसाठी भारताकडे वळला आहे. भारतातील राजकीय स्थिरता आणि वितरण प्रणाली सुरळीत आहे. यामुळे अमेरिकेतील खरेदीदार भारताला विश्वासार्ह मानत आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या कपड्यांपैकी एक तृतीयांश कपडे अमेरिकेत जातात. अमेरिकेला कपडे पुरवणारा भारत जगातील चौथा मोठा देश आहे. त्यातच आता बांगलादेशातील परिस्थितीमुळे जागतिक स्तरावरील कंपन्यांचे लक्ष भारताकडे वळले आहे. भारतातून कपडे मागवणे अमेरिकन कंपन्यांना सोयीचे वाटते. भारतातून बहुतेक सुती कपडे अमेरिकेत जातात.
        अमेरिकन अंतरराष्ट्रीय व्यापार आयोगने (ITC) नुकताच एक अहवाल दिला आहे. त्यात म्हटले आहे की,भारत, बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि कंबोडिया या देशांनी गेल्या काही वर्षांत अमेरिकेत सर्वाधिक कपड्यांची निर्यात केली होती. या सर्व देशांनी चीनला मागे टाकले होते. 2013 मध्ये अमेरिकेने आयात केलेल्या सर्व कपड्यांपैकी 37.7% कपडे चीनमधून आले होते. पण, 2023 मध्ये हा आकडा घसरला असून 21.3% वर आला आहे. या काळात भारतातून अमेरिकेत निर्यात होण्याचा वाटा 4% वरून 5.8% पर्यंत आला आहे.
         बंगालादेशातील परिस्थितीमुळे गेल्या वर्षी भारताने अमेरिकेला 4.6 अब्ज डॉलरचे कपडे निर्यात केले होते. म्हणजे अमेरिका भारतीय कपड्यांचा सर्वात मोठी खरेदीदार झाला आहे. बंगालादेशातील अस्थिरतेचा सर्वाधिक फायदा व्हिएतनामला झाला आहे. व्हिएतनामने गेल्या दशकात आपला हिस्सा 10% वरून 17.8% पर्यंत वाढवला आहे.
बांगलादेश किंवा इतर आशिया देशांपेक्षा अमेरिकन कंपन्या भारतातून कपडे घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्याला मुख्य कारण भारतातील राजकीय स्थिरता आहे. भारतात कॉटनचे कपडे उच्च दर्जाचे आहेत. भारतात त्यासाठी लागणारा कच्चा माल आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. भारतातच धागा बनवण्यापासून ते कापड बनवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया होते. यामुळे अमेरिकन कंपन्या भारताला विश्वासार्ह पुरवठादार मानतात. बांगलादेशातील परिस्थितीमुळे भारतीय बाजारपेठ विश्वसार्ह बाजारपेठ ठरली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In देश-विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…