no images were found
पर्यावरणाच्या समतोलासाठी मगरींचे संवर्धन गरजेचे: डॉ. मनोज बोरकर
कोल्हापूर (प्रतिनिधी): पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मगरींचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. मनोज बोरकर (Professor and Head, Department of Zoology; Carmel College for Women, Goa) यांनी ‘Crocks on the Rocks’ या विषयावर शुक्रवारी (दि. २५) बोलताना केले.
शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात आयोजित शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब तानसेन वरुटे स्मृती व्याख्यानमालेत १६ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार होत्या. भारतात आढळणारऱ्या मगरींच्या विविध प्रजाती , त्यांचे अधिवास, त्यांची वर्तणूक, या बद्दल सविस्तर माहिती दिली. माणसावर मगरी नेहमी हल्ला करत नाहीत, माणसावर हल्ला करणाऱ्या मगरींच्या प्रजाती त्यांनी सांगीतल्या. मगरींचा अधिवास हळू हळू नष्ट होण्याची कारणे त्यांनी सांगितली. पुराणामध्ये मगरींचे खूप महत्व आहे हे सांगताना त्यांनी मगरींचे पर्यावरणातील महत्व अधोरेखित केले. तसेच मगर आणि इतर प्राण्यांचा संवर्धनासाठी आणखी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे, असे सांगितले.
व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. एस. एम. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. विभागप्रमुख डॉ. एस. आर. यंकंची यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. एम. व्ही. वाळवेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. ए. ए. देशमुख, डॉ. एन. ए. कांबळे, डॉ. एम. पी. भिलावे, डॉ. ए. डी. गोफणे आणि प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.