
no images were found
जप्ती केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहीर लिलाव
कोल्हापूर : अक्षता साडी सेंटर प्रो.प्रा. सागर बालचंद खियाणी यांच्याकडून एकूण 2 लाख 4 हजार 48 रु. इतकी रक्कम वसुल करण्याकरिता श्रीम. लक्ष्मीबाई बालचंद खियाणी यांच्या मालकीचे ग्रामपंचायत गांधीनगर ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील मिळकत क्रमांक 2713 क्षेत्रफळ 77.97 (839.28 चौ.फु.) कसुरदार यांचे हिस्सेपुर्तीची स्थावर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये विक्रीसाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी पुर्वोवत एकूण 2 लाख 4 हजार 48 रुपये रक्कम भरली नाही तर नमुद केलेली मालमत्ता तहसिलदार कार्यालय, करवीर येथे दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जाहीर लिलावाने विकली जाईल, अशी माहिती करवीर तहसिलदार यांनी दिली आहे.
ही विक्री उक्त कसुरदारांच्या उक्त संपत्तीवरील अधिकार, हक्क आणि हित संबंध यांच्या पुरतीच मर्यादीत आहे.
लिलावाच्या शर्ती- खालीलप्रमाणे-
ग्रामपंचायत गांधीनगर ता. करवीर, जि. कोल्हापूर या मालमत्तेची मुल्यांकन किंमत १७,76, 704/- इतकी असून यापेक्षा कमी बोली स्विकारली जाणार नाही. लिलाव मंजूर अंतरावर पूर्ण केला जाईल. ज्यांच्या नावे लिलाव पूर्ण होईल त्याने १/४ रक्कम तात्काळ भरावयाची आहे. लिलाव मंजूर झाल्यानंतर लिलाव धारक यांना समज दिल्यापासून तीन दिवसात उर्वरित ३/४ रक्कम जमा करावयाची आहे. ३/४ रक्कम जमा न केल्यास फेरलिलाव केला जाईल व त्यात बोली कमी आल्यास अशी कमी पडणारी रक्कम पूर्वी जमा केलेल्या १/४ रकमेतून वजा केली जाईल. थकबाकीदाराने लिलाव पुकारलेनंतर ३० दिवसाच्या आत संपूर्ण थकबाकी, नोटीस फी, लिलाव पुकारलेचा खर्च इत्यादी खर्च जमा करुन लिलाव रद्द करणेस सक्षम अधिकार-याकडे विनंती केल्यास लिलाव ज्याच्या नावे मंजूरी अंतरावर पूर्ण केला आहे. त्यास बोली रक्कमेच्या 5 टक्के रक्कम मानधन म्हणून अदा करावी लागेल सक्षम अधिकाऱ्याकडून लिलाव मंजूर झाल्यानंतर विक्री प्रमाणपत्र दिले जाईल त्या आधारे लिलाव धारकास मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल.