
no images were found
आयुष्यात जे मिळाले त्याचे श्रेय शिवाजी विद्यापीठास
कोल्हापूर (प्रतिनिधी): भाषेच्या विद्यार्थ्यांना फक्त कला शाखेपर्यंत मर्यादेत न राहता वाणिज्य, विज्ञान, आरोग्य इत्यादी शाखांमध्ये भरपूर संधी उपलब्ध असल्याचे मत पद्मश्री प्रो. गणेश देवी यांनी व्यक्त केले व आयुष्यात जे जे मिळाले त्याचे श्रेय शिवाजी विद्यापीठ व इंग्रजी विभागास असल्याची प्रांजळ कबुली ही दिली.
हिंदी विभागामध्ये आयोजित 'विद्यार्थ्यांशी संवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. देवी यांनी मराठी भाषेवर संशोधनात्मक काम करणार असून यासाठी विना मानधन काम करणार्या स्वयंसेवकांनी या कार्यास सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने यांनी डॉ. देवी हे इंग्रजी विभाग व शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन संशोधक विद्यार्थी कोमल पोळ यांनी केले. डॉ. अक्षय भोसले, प्रा.
अनिल मकर, गुलामगौस तांबोळी, प्राजक्ता रेणुसे यांनी प्रश्न विचारले. यावेळी हिंदी विभागाच्या प्र. प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी, विदेशी पत्रकार समंथा सुब्रमण्यम , डॉ. सुरेखा
देवी, डॉ. एम. एस. वासवानी, डॉ. ए. एम. सरवदे, डॉ. राजश्री बारवेकर, डॉ. दीपक भादले, डॉ. प्रकाश मुंज, डॉ. संतोष कोळेकर यांच्यासह मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.