no images were found
विदेशी भाषा प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. त्वरित संपर्क साधावा
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागातर्फे एक वर्ष कालावधीचे रशियन, जर्मन, जपानी, पोर्तुगीज, फ्रेंच भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यात येतात. या अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता प्रत्येकी ५० इतकी आहे. यासाठी १२ वी उत्तीर्ण किंवा समकक्ष अशी प्रवेशअर्हता आहे. दररोज सायंकाळी एक तास याप्रमाणे वर्ग असतात. इतर कोणतेही शिक्षण घेत अथवा नोकरी करत हे अभ्यासक्रम करता येतात.
सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षासाठी शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागातील रशियन, जर्मन, जपानी, पोर्तुगीज भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत दि. २४/०८/२०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
प्रवेशाबाबत अधिक माहिती www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावरील “Admission 2024” या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य” या तत्त्वावर प्रवेशासाठी ०२३१-२६०९२३७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा व शिवाजी विद्यापीठात भाषा भवन येथील विदेशी भाषा विभागास भेट द्यावी आणि उद्योग, व्यापार, पर्यटन, हॉटेल, सांस्कृतिक दूतावास, तसेच भाषांतर क्षेत्रात करिअरच्या संधी मिळवण्यासाठी विदेशी भाषा अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात येत आहे.