Home Uncategorized पांरपारिकता आणि आधुनिकता यांची समन्वय साधन यशस्वी उद्योजक बना –  स्मिता खामकर

पांरपारिकता आणि आधुनिकता यांची समन्वय साधन यशस्वी उद्योजक बना –  स्मिता खामकर

0 second read
0
0
26

no images were found

पांरपारिकता आणि आधुनिकता यांची समन्वय साधन यशस्वी उद्योजक बना –  स्मिता खामकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) – तिटवे : ग्रामीण भागातील मुलींनी स्वतः उद्योजक बनणे आवश्यक आहे. मुलींनी स्वतः ठाम आत्मविश्वासाने ध्येय निश्चित करून अगदी कमी भांडवलामध्ये सुरू होणाऱ्या व्यवसायाकडे लक्ष दिल्यास मुली सहज उद्योजक बनू शकतात. महिला कमवत्या झाल्यानंतर त्यांना समाजात एक वेगळे स्थान निर्माण होत असते. अडचणींमधून संधी शोधत आणि ग्रामीण भागातील नेमक्या शहर – महानगर वासियांना आकर्षण असणारे वस्तु चे मार्केटिंग करून यशस्वी उद्योजक बना असे मत संस्कार शिदोरीच्या संस्थापिका स्मिता खामकर यांनी शहीद महाविद्यालयाच्या फ्रेशर्स पार्टीमध्ये व्यक्त केले व्यक्त केले. यावेळी जे.जे. इव्हेंट मॅनेजर कंपनीच्या संस्थापिका ज्योती जाधव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

वाढत्या आर्थिक स्तरामुळे आणि प्रसिद्धी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे आपा ग्रामीण भागात गाव पातळीवर तालुका स्तरावर ही इव्हेंट साठी मोठ्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत त्याच आहेत त्याचा नेमकेपणे शोध घ्यावा असे यावेळी करत या संदर्भात आपण नेहमी मार्गदर्शनास तयार असल्याचे जे जे इव्हेंट च्या ज्योती जाधव यांनी यावेळी सांगितले .मनसोक्त धम्माल करण्याचं आणि त्यांत सीनिअर्सनीही आपल्या वाटची मजा करून घेण्याचं निमित्त म्हणजे महाविद्यालयातील ‘फ्रेशर्स पार्टी’. अशाच फ्रेशर्स पार्टीतून तिटवे (ता. राधानगरी) येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात नवोदित विद्यार्थिनींचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. भन्नाट थीम, डीजेच्या ठोका, कॅटवॉक, डान्स आणि वेगवेगळ्या फनी गेम्समुळे विद्यार्थिनींनी या पार्टीत धम्माल केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा
वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्यात्यांनी यावेळी आपल्या हितगुजभर मनोगत मध्ये प्रचंड सकारात्मकता ही जीवनात यशस्वी साठी गरजेचे असून संकटे ही सुद्धा नवीन संधी देणारी आहेत या दृष्टीकोनातून सकारात्मकतेने घ्यावीत अशी मत असे आग्रहाने नमूद केले .याप्रसंगी प्रा.स्वाती पोवार, प्रा.काजल बलगुडे,प्रा.सिद्धता गौड,प्रा.गायत्री पाटील यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या स्वागत सोहळ्याला असलेल्या दोन्हीही यशस्वी उद्योजिका यांची कुटुंबीयांची लष्करी पार्श्वभूमी आहे आणि हे एक सकारात्मक वेगळेपण आहे असे नमूद करत समन्वयक आरोग्यमित्र – पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली .येत्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी आणि भविष्यातील यशासाठी विद्यार्थिनींना त्यांनी शुभेच्छा दिल्या. वेगवेळ्या खेळांमध्ये विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. डीजेच्या ठेक्यावर पोवड्यापासून लावणीपर्यंतच्या सादरीकरणा सह विद्यार्थिनींनी स्वागत सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला .
याप्रसंगी उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा. दिग्विजय कुंभार, सर्व विभाग प्रमुख शिक्षकवृंद आणि विद्यार्थीनी उपस्थितीत होत्या. हा कार्यक्रम प्राचार्य प्रशांत पालकर यांच्या मार्गदर्शना खाली पार पडला. सूत्रसंचालन साक्षी अस्वले आणि प्रा. प्रतिज्ञा कांबळे यांनी केले. आभार प्रा. सिद्धता गौड यांनी मानले. .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…