no images were found
नोकर्या मागण्यापेक्षा देणारे व्हा एस.एन.सपली; विद्यापीठात नवोपक्रम उत्साहात
कोल्हापूर (प्रतिनिधी): दररोजच्या जगण्यातील भेडसवणार्या अनेक छोट्या- मोठ्या समस्यांवर उपाय शोधा व त्याचे स्टार्ट-अप मध्ये रूपांतर करून नोकर्या मागण्यापेक्षा नोकर्या देणारे युवा उद्योजक बनावे, असे आवाहन तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. एस. एन. सपली यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये सोमवारी आयोजित लीन स्टार्ट-अप अँड मिनिमम व्हायबल प्रोडक्ट कार्यक्रमात ते बोलत होते. तंत्रज्ञान, इंग्रजी, हिंदी अधिविभाग,
सेंटर ऑफ इनोव्हेशन, इनकयूबेशन अँड लिंकेजस व रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
इनोव्हेशन केंद्राचे समन्वयक प्रा. हर्षवर्धन पंडित यांनी इनोव्हेशन सेंटर, रिसर्च फाऊंडेशन आविष्कार, स्टार्ट-अप इत्यादी उपक्रमांविषयी माहिती दिली. हिंदी विभागाच्या प्र. प्रमुख प्रो. (डॉ.) तृप्ती करेकट्टी यांनी हिंदी विभागात इनोव्हेशन क्लब स्थापन करत असल्याचे सांगत यामध्ये d/Pooja/adm/news 2024/lean start up innovation सहभाग घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख प्रो. डॉ. प्रभंजन माने उपस्थित होते.
प्रस्तावना कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. एम. एस. वासवानी यांनी केले. सूत्रसंचालन मृणाल मोहिते हिने केले. आभार डॉ. संतोष कोळेकर यांनी व्यक्त केले. यावेळी मेघा तोडकर, श्रावणी चिपळूणकर, स्वप्नाली धुलुगडे या विद्यार्थिनींनी मत व्यक्त केले. यावेळी हिंदीचे प्रा. डॉ. प्रकाश मुंज, प्रा. अनिल मकर, डॉ. जयसिंग कांबळे, प्रा. प्रकाश निकम, डॉ. भाग्यश्री पुजारी, इंग्रजी विभागाचे डॉ. ए. एम. सरवदे, डॉ. राजश्री बारवेकर, डॉ. सी. ए. लंगरे, डॉ. दीपक भादले, डॉ. सुरेंद्र उपरे यांच्यासह विद्यार्थी,
संशोधक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.