
no images were found
विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सोमवारी तिमाही बैठक
कोल्हापूर : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही सभा सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीत सभागृह क्र.1 येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महसूल उप आयुक्त आण्णासाहेब चव्हाण यांनी दिली आहे.
प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन झाल्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत तीन महिन्यात आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो, असेही श्री. चव्हाण यांनी कळविले आहे.