
no images were found
कोल्हापूर महानगरपालिका रस्त्यावरील स्क्रॅप वाहने हटवणार
कोल्हापूर : अतिक्रमण विभाग व संबंधित विभागीय कार्यालयामार्फत १२ डिसेंबरपासून उभ्या वाहनांवर कारवाई सुरु करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरात बऱ्याच ठिकाणी वाहने बंद अवस्थेत (स्क्रॅप) एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे उभी आहेत. ही वाहने रस्ते पुल, उडडाण पुल येथे अनाधिकृतपणे सोडून दिलेली आहेत. अशा बेवारस वाहनामुळे वाहतुकीस मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होऊन अपघातास निमंत्रण मिळत आहे.
रस्त्यावर वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या अशा वाहनांवर कारवाई करण्याचा शासन निर्णय झाला आहे. बेवारस स्थितीत असलेल्या रस्त्यावरील वाहनांच्या मालकांनी वाहने सार्वजनिक ठिकाणी वर्षानुवर्षे बंद अवस्थेत उभी केलेली आहेत ती आपण स्वत:हून हटवून महानगरपालिकेस सहकार्य करावे व जप्तीचा कटू प्रसंग टाळावा असे आवाहन अतिक्रमण विभागाच्यामार्फत करण्यात आले आहे.