no images were found
महाराष्ट्र सरकारचा सुमित SSG सह प्रगत MEMS 108 रुग्णवाहिका प्रकल्प सार्वजनिक आरोग्यसेवेत पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज
मुंबई : सुमित फॅसिलिटीज लिमिटेड इंडिया, SSG ट्रान्सपोर्ट सॅनिटेरियो SL, स्पेन आणि याआधीचे सेवा पुरवठादार BVG इंडिया लिमिटेड, ह्याच्या मार्फत नवीन ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’ (MEMS) 108 रुग्णवाहिका प्रकल्प महाराष्ट्र राज्यात अंमलात आणणार आहेत. हा प्रकल्प अॅडव्हांस्ड ग्लोबल स्टँडर्डच्या उपयोगाद्वारे अत्याधुनिक टेकनॉलॉजिचा वापर करून भारतातील आपत्कालीन वैद्यकीय सेवेमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी सज्ज आहे. हा 10 वर्षाचा प्रकल्प सेवा कार्यक्षमता, आणि परिणामकारकता यांना मोठ्या स्तरावर चालना देणारा आहे. हा प्रकल्प अत्याधूनिक टेक्नॉलॉजी वापरून महाराष्ट्रातील आरोग्यसेवा क्षेत्रात व्यापक प्रमाणात सुधारणा घडवून आणेल तसेच एक नवीन ऑपरेशनल मॉडेल पुढे येईल असे अपेक्षित आहे.
सध्या, भारतभरातील रुग्णवाहिका सेवा प्रामुख्याने पेशंट ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस (PTS) म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र सरकारने कल्पना केलेल्या या नवीन प्रकल्पाचे उद्दीष्ट रुग्णाच्या आपत्कालीन परिस्थितीच्या गंभीर गोल्डन अवर्समध्ये विशेष वैद्यकीय उपकरणांचा वापर करून जीव वाचविणे आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य खात्याच्या नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत असलेल्या या प्रकल्पाचा उद्देश अडवान्सड लाईफ सपोर्ट रुग्णवाहिकांचा उपयोग करून गंभीर आणि गैर-गंभीर परिस्थितीत असलेल्या रूग्णांना प्री-हॉस्पिटल आपत्कालीन आरोग्य सेवा प्रदान करणे, रुग्णांना स्टॅबीलाईज करणे आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये तत्परतेने पोहचवणे हा आहे. हा इनिशीएटीव्ह अपघात, गंभीर रोग, नैसर्गिक आपत्ती अशा इतर अनेक हेल्थ इमर्जन्सी कव्हर करतो.
हे मॉडेल भारतात पहिल्यांदाच पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप (PPP) डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्सफर(DBFOT) तत्वावर तयार केले गेले आहे ज्यामध्ये सेवा प्रदाता भांडवली खर्चाच्या 51% योगदान करतील तर सरकार 49% योगदान करेल. MEMS-108 प्रोजेक्ट अॅडव्हान्स्ड मेडिकल टेक्नॉलॉजी, डेटा अॅनॅलीटिक्स आणि हाय-टेक कम्युनिकेशन सिस्टिम्स इंटिग्रेट करून आपत्कालीन वैद्यकीय सेवा रिडीफाईन करण्यासाठी तयार आहे. हा प्रकल्प संपूर्ण राज्यामधील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये 24/7 सेवा देईल. ह्या प्रकल्पाची रचना ही NG911 स्टँडर्ड वर आधारित असून फक्त ऍम्ब्युलन्सच नव्हे तर अत्याधुनिक इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर (ERC) मध्ये देखील डॉक्टरचा समावेश केला गेला आहे ज्यामुळे जलद रिस्पॉन्स टाईमची खात्री प्रदान होईल.
याशिवाय सरकारतर्फे पुरवल्या जाणाऱ्या या मोफत आपत्कालीन सेवेबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी व्यापक अशी माहिती, शिक्षण आणि संवाद मोहीम राबवली जाईल. यापुढे जाऊन हा इनिशीएटीव्ह कुशल आणि अकुशल कॅटेगरीमध्ये 14000 लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल. या प्रकल्पाचे ध्येय महाराष्ट्रातील सर्व 14 कोटी नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवेची खात्री करून समान आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवा प्रदान करणे आहे. अशा सुधारित सेवा वितरणाद्वारे सार्वजनिक विश्वास आणि पारदर्शकता वाढेल. संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर केल्यामुळे राज्यातील आरोग्यसेवा खर्च कमी होईल आणि आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता सुधारेल.
हा प्रकल्प भारतातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये एक नवीन बेंचमार्क म्हणून उभा राहील, जो केवळ तांत्रिक प्रगती आणि ऑपरेशनल कार्यक्षमताच नाही तर सेवा प्रदात्यांद्वारे दर्जेदार सेवा वितरणासाठी भविष्यातील सार्वजनिक-खाजगी सहकार्यासाठी एक शाश्वत मॉडेल देखील राहील.
नवीन MEMS 108 प्रोजेक्ट संपूर्ण राज्यामध्ये पाच टप्प्यांमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये राबविण्यात येईल.
फ्लीटची महत्त्वाची आधुनिक वैशिष्ट्ये आणि नवीन इंटरनॅशनल स्टँडर्ड अपग्रेड्स:
अपग्रेड केलेली फ्लीट ABS/PPMA मटेरियलच्या हाय-एंड बॉडी किटवर आधारित आहे, जे याला सर्वाधिक टिकाऊपणा आणि शक्ती प्रदान करते. हे बॉडी किट उच्च गुणवत्तेच्या लाइफसेव्हिंग मेडिकल इक्विपमेंटने सुसज्ज आहे. सुधारित मानके डिझाइनच्या गुणवत्तेवर आधारित आवश्यकता निर्दिष्ट करतात, कार्यप्रदर्शन आणि KPI आधारित रिपोर्टिंग स्ट्रक्चर जे चांगल्या रुग्णांच्या परिणामांसाठी महत्त्वाचे आहेत.
न्यू एज टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन्स:
जेथे पूर्वीच्या रुग्णवाहिकांमध्ये बेसिक मोबाइल फोन आणि कॉलरसोबत दिशेसाठी कोओर्डीनेशन वर अवलंबीत्व होते तिथे आता तांत्रिक अपग्रेडमध्ये मोबाइल डेटा टर्मिनल्स (MDT), टॅब्लेट PC, RFID, GPS, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, CCTV, TRIAGE सिस्टम, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट (CRM), कॉम्प्यूटर-एडेड डिस्पॅच (CAD), वेहिकले ट्रॅकिंग आणि मॅनेजमेंट सिस्टम (VTMS) सेन्सर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.
सर्व कर्मचार्यांसाठी तयारी आणि आपत्कालीन ट्रेनिंगसाठी एनहान्स्ड ट्रेनिंग मॉड्यूल देखील विकसित केले जातील.
फ्लीट साईझ पूर्वीच्या 937 वरुन 1756 झाली आहे:
अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट (ALS) रुग्णवाहिका – 255
बेसिक लाईफ सपोर्ट (BLS) रुग्णवाहिका – 1274
नवजात शिशु रुग्णवाहिका – 36
फर्स्ट रेस्पॉन्डर बाईक्स – 166
समुद्री बोट रुग्णवाहिका – 10
नदी बोट रुग्णवाहिका – 15
2013 मधील 937 (ALS-233, BLS-704) रुग्णवाहिकेसाठी एकूण भांडवली खर्चाचे खरेदी मूल्य अंदाजे 240 कोटी रुपये होते. 2024 मध्ये 1756 रुग्णवाहिकेसाठी अंदाजे 870 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे जे नवीन आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड्स आणि स्पेसिफिकेशन आणि फ्लीट टाईप मधील विविधता दर्शविते. सरकारद्वारे केला जाणारा वार्षिक ऑपरेशनल खर्च विस्तारीत सेवा आणि दुप्पट फ्लीट साईजमुळे अंदाजे रु. 425 कोटी वरुन रु. 800 कोटी असा जाणार आहे.
भविष्यात, राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांमध्ये अती जलद वैद्यकीय मदतीसाठी हेलिकॉप्टर्स, तसेच ड्रोन्स वापरण्यासाठी आणि सर्व हॉस्पिटस मध्ये पेशंट अरायव्हल इन्टिमेशन सिस्टिमसाठी फॉरवर्ड इंटिग्रेशनचे करण्याचे प्रयोजन केले आहे.
नागरिक 108 डायल करून या विनामूल्य सेवेचा लाभ घेऊ शकतात ज्यामुळे गंभीर परिस्थितीला त्वरित आणि कार्यक्षम प्रतिसाद सुनिश्चित होईल.
श्री. सुमित साळुंके,व्हाईस चेअरमनसुमित ग्रुप एंटरप्राइज,यांनी सरकारच्या या अलौकिक इनिशीएटीव्हद्वारे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्याची पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्याप्रती आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे. त्यांनी या उपक्रमाद्वारे शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्ण सेवा आणि आपत्कालीन सेवा प्रतिसादाच्या वेळेत सुधारणा आणण्याचे आश्वासन व्यक्त केले आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाचे आणि प्रशासकांचे कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले की त्यांनी अशी उच्च गुणवत्ता आणि युरोपियन आणि उत्तर अमेरिकन स्टँडर्डना अनुसरून असलेली EMS सेवा भारतात आणली.
श्री. डिएगो प्रीटो ऑलिव्हर, व्हाईस-चेअरमन SSG ट्रान्सपोर्ट सॅनिटेरियो SL,यांनी अशी टिप्पणी केली की, “या प्रकल्पासाठी महाराष्ट्राने अशी स्पष्ट आणि नाविन्यपूर्ण मानसिकता स्वीकारली हे पाहणे प्रेरणादायक आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचे गुणवत्ता मानके जागतिक दर्जाशी सामानंतर केले आहेत. ही सुधारणा आपत्कालीन सेवेला ला जागतिक स्तरावर परिभाषित करते आणि त्याबरोबरच एका अशा भरीव प्रगतीला दर्शविते जी भारतातील EMS इंडस्ट्रीमध्ये क्रांती घडवेल.”