
no images were found
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती सज्ज : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर (प्रतिनिधी):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने लोकहिताचे निर्णय घेतल्या असून, कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. लोकहिताचे निर्णय आणि विकास कामांच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्यास महायुती सज्ज आहे. लाडकी बहिण, मुलींना मोफत शिक्षण, एस. टी. प्रवास सवलत, अशा योजनांसह कोल्हापूर सांगली पूरनियंत्रण, सौर ऊर्जा प्रकल्प असे लोकहिताचे प्रकल्प राज्यात राबविले जातं आहेत. याच कामांच्या शिदोरीवर महायुतीचे शिलेदार सज्ज असून, विधानसभा निवडणुकाप्रमाणे याही निवडणुकीत विरोधक चारीमुंड्या चित झालेले पाहायला मिळतील, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.