
no images were found
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
कोल्हापूर, : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज दसरा चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिणी चव्हाण, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी पोलीस विभागाच्या बँड पथकाकडून मानवंदना देण्यात आली.