no images were found
शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्ष पदी निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी): पालकमंत्री प्रकाश अबीटकर यांच्या निर्देशाने आणि महाराष्ट्र नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक रंगराव चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्ष पदी निवड केली आहे.
या महत्त्वाच्या पदावर दीपक चव्हाण यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील निराधार, वृद्ध आणि असहाय्य व्यक्तींना योजनेचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळण्यास मदत होणार आहे. संजय गांधी निराधार योजना ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून यांतर्गत गरजू व्यक्तींना आर्थिक सहाय्य, वैद्यकीय मदत आणि सामाजिक संरक्षण मिळते. दीपक चव्हाण हे शिवसेना पक्षाचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख म्हणून काम करत आहेत. त्यांनी शाखाप्रमुख, उप शहर प्रमुख पदावर काम केले आहे ते आमदर राजेश क्षीरसागर यांचे निकटवर्तीय आहेत ते आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कोल्हापूर शहर प्रमुख पदा पासून त्यांच्या सोबत आहेत
पालकमंत्री प्रकाश अबीटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सक्रिय सहभागाने ही नियुक्ती करण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली. नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी या जबाबदारीला सामोरे जाताना योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना त्वरित मदत पोहचविण्याची ग्वाही दिली. यासह शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेत निष्ठावंताना खरा न्याय मिळत असल्याची भावना व्यक्त करीत, नियुक्तीबद्दल उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि नियुक्तीसाठी विशेष योगदान दिल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांचे आभार मानले. या पदावर एक प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकाची निवड करण्यात आली अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. दीपक चव्हाण हे या पदाला न्याय देऊ शकतील याभावणेने दीपक चव्हाण यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.