
no images were found
सिद्धगिरी जननी व कोल्हापूर मनपाचा संयुक्त उपक्रम
वंध्यत्व तपासणी कक्षाचे उद्घाटन;
कोल्हापूर, (प्रतिनिधी):– सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, राष्ट्रीय वंध्यत्व जागृकता सप्ताह निमित्ताने, कोल्हापुरात पहिल्यांदाच शासकीय स्तरावर मोफत वंध्यत्व तपासणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. सावित्रीबाई फुले रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमात नागरिक, महिला आणि आरोग्य क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उप आयुक्त मा. श्री. पंडित पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की, “सिद्धगिरी जननीमार्फत गरजू रुग्णांसाठी सुरु झालेले तपासणी शिबीर निश्चितच लाभदायक ठरेल. ही सुविधा अनेक दाम्पत्यांना आशेचा किरण ठरेल.”
यावेळी बोलताना डॉ. वर्षा पाटील म्हणाल्या, “पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रेरणेने गरजू व गरीब जोडप्यांना वात्सल्य सुख मिळावे या उद्देशाने सिद्धगिरी जननी तर्फे याठिकाणी दर गुरुवारी मोफत तपासणी श शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक गर्भधारणा राहण्यासाठी व कमीत कमी खर्चात उपचार देण्यासाठी आम्ही कटिबध आहोत.”
यावेळी बोलताना विवेक सिद्ध म्हणाले, “वंधत्वाचे उपचार अतिशय महाग आहेत, सर्व सामान्य लोकांना ते परवडणारे नाहीत. एखादी सायकल फेल गेली तर पुनः ते उपचार करणे लोकांच्या आवाक्या बाहेर आहे. अशा लोकांच्या करिता हे मोफत तपासणी व उपचार शिबीर वात्सल्य सुखाची पर्वणी ठरेल.”
या उपक्रमासाठी आयुक्त के. मंजुलक्ष्मी व सिद्धगिरी जननीच्या संचालिका डॉ. वर्षा पाटील यांनी प्केरयत्लेन केले आहेत. त्यांच्या पुढाकारानेच कोल्हापुरात वंध्यत्व उपचारांची मोफत तपासणी आता सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे.
कार्यक्रमाच्या वेळी डॉ. प्रकाश प्रवरा, डॉ. संजना बागडी, डॉ. औंधकर, डॉ. अमोलकुमार माने, विवेक सिद्ध, अनुराधा शिंदे, पुनीत मुचंडी, डॉ. उज्वला माळी, तसेच आशा सेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमामुळे वंध्यत्वासारख्या गुंतागुंतीच्या विषयावर जनजागृती वाढून, गरजू जोडप्यांना मोफत तपासणी व सल्ला मिळणार असून, सरकारी पातळीवर एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.