Home मनोरंजन सुप्रसिद्ध गायिका के. एस. चित्रा यांचं मराठी गाणं “तुझ्या प्रेमाची साथ मिळता” प्रदर्शित !! 

सुप्रसिद्ध गायिका के. एस. चित्रा यांचं मराठी गाणं “तुझ्या प्रेमाची साथ मिळता” प्रदर्शित !! 

13 second read
0
0
8

no images were found

सुप्रसिद्ध गायिका के. एस. चित्रा यांचं मराठी गाणं “तुझ्या प्रेमाची साथ मिळता” प्रदर्शित !! 

 

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज राजगोपाल नायर लिखित आणि दिग्दर्शित “माझी प्रारतना” ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेपचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. दोघं कलाकारांना आपण शेतात रोमांस करत एकमेकांच्या मिठीत हरवलेले पाहू शकतो. यांच्यात हळुवार खुलत जाणाऱ्या प्रेमभावना या गाण्यातून व्यक्त होत आहे. दोघंही या गाण्याच्या माध्यमातून प्रेमाचे धागेदोरे घट्ट बांधताना दिसत आहेत. एकमेकांबद्दलची ओढ या गाण्यातून दिसत आहे. गायकांनी गाण्यात अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण केले आहे. हे एक अप्रतिम लव्ह सॉंग आहे जे संगीत प्रेमींन नक्कीच आवडेल. विश्वजित सी टी ह्यांनी या गाण्याला संगीत दिलय, तर सुप्रसिद्ध गायिका के. एस. चित्रा ह्यांनी आपला आवाज दिलाय तर गाण्याचे बोल हे पद्माराज राजगोपाल नायर ह्यांनी लिहिले आहेत. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध भारतीय गायिका के. एस. चित्रा, ज्यांना “नाइटिंगेल ऑफ साऊथ इंडिया” म्हणून ओळखलं जातं, यांनी आपली मराठी गाण्याची कारकीर्द सुरू केली ती “माझी प्रार्थना” या चित्रपटातील गाण्याद्वारे. याच गाण्याद्वारे त्यांनी मराठी संगीतविश्वात एक भावनिक आणि सुंदर पाऊल टाकलं. 

     गायिका के.एस. चित्रा ह्यांनी याबद्दल आपलं मत व्यक्त करत सांगितलं “माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की मी ‘माझी प्रारतना’ या मराठी चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. मराठी ही माझी नेहमीची भाषा नसल्यामुळे यात गायन करणं माझ्यासाठी एक आव्हान होतं, पण श्री पद्माराज राजगोपाल नायर यांनी उच्चार आणि शब्दोच्चार यात फार मोलाची मदत केली. आणि त्या भावनेला अंत:करणातून अनुभवून मी गाणं उत्तम प्रकारे सादर करू शकले. मला मराठी मध्ये एक सुंदर गाणं गाण्याची इच्छा होती आणि “माझी प्रारतना” या चित्रपटाद्वारे मला तीन गाणी गायचं सौभाग्य लाभलं. ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता’, ‘तूच माझी मूळ’ आणि ‘सांगायचं आहे’ (विठ्ठला) ही गाणी श्री पद्माराज राजगोपाल नायर यांनी लिहिलेली असून, संगीत दिग्दर्शन श्री विश्वजीत सी टी यांचं आहे. विश्वजीतजी हे अतिशय उत्तम संगीतकार आहेत आणि त्यांच्यासोबत मी अनेक वेळा काम केले आहे आणि प्रत्येक वेळा मला त्यांच्या सोबत काम करून आनंद मिळतो. ‘माझी प्रारतना’ हा चित्रपट तुम्ही ९ मे रोजी नक्की पहा आणि त्यातील संगीत, कथा आणि अभिनयाचा आनंद घ्या.

      खरं प्रेम ते आहे ज्यामध्ये स्वत:च्या सुखापेक्षा समोरील व्यक्तीच्या सुखाचा सर्वात जास्त विचार केला जातो. अशीच प्रेमाची एक नवी कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पहायला मिळणार आहे. पद्माराज राजगोपाल नायर लिखित आणि दिग्दर्शित “माझी प्रारतना” हा नवा सिनेमा महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेली संगीत प्रधान प्रेम कथा आहे. 

     या चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मराठी सिनेश्रुष्टीतील आणखी काही उत्कृष्ट कलाकार आपल्याला दिसणार आहेत. एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत “माझी प्रारतना” या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर ह्यांनी केलं आहे, पद्माराज नायर फिल्म्स ह्यांची निर्मिती आहे तर विश्वजित सी टी ह्यांनी संगीत दिलंय. “माझी प्रारतना” हा सिनेमा ९ मे २०२५ पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध करावी- मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध करावी- मुख्यमंत्री…