
no images were found
या वसुंधरा दिनी सोनी सबचे कलाकार मोठ्या बदलासाठी छोट्या छोट्या कृतींची प्रेरणा देत आहेत
22 एप्रिल रोजी जगभरात साजरा होणारा वसुंधरा दिन आपल्याला पृथ्वीग्रहाच्या रक्षणार्थ आपल्या सामूहिक जबाबदारीची आठवण करून देतो. हवामान बदलापासून ते शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यापर्यंत वसुंधरा दिन आपणा सर्वांना अधिक हरित भविष्यासाठी अर्थपूर्ण पावले उचलण्यासाठी प्रेरित करतो. या विशेष दिवसाच्या लक्षणीयतेबद्दल बोलताना सोनी सबचे कलाकार करुणा पांडे, वृही कोडवारा, परिवा प्रणती आणि आदित्य रेडिज पर्यावरणीय जागरूकता, व्यक्तिगत ईको-फ्रेंडली सवयी यांचे महत्त्व सांगून आपापल्या खास पद्धतीने ते निसर्गाची परतफेड करून हा दिवस कसा साजरा करणार आहेत, ते सांगत आहेत.
पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पा ही व्यक्तिरेखा साकारणारी करुणा पांडे म्हणते, “प्रदूषणाची वाढती पातळी, हवामान बदल, पर्यावरणाची हानी करणाऱ्या व आपल्या ग्रहाचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या इतर समस्यांविषयी जागरूकता आणण्यासाठी वसुंधरा दिन साजरा करणे आवश्यक आहे. कोविड-19 नंतर मला वाटते की, आपल्याला पर्यावरणाचे महत्त्व पुरते समजले आहे. आपल्या पृथ्वीचे आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याचा सोपा मार्ग म्हणजे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. विविध वस्तू वापरताना आपण शाश्वत पद्धतींचा अवलंब केला पाहिजे आणि नैसर्गिक संसाधने आणि लँडफिल जागांचे जतन करताना या तीन ‘आर’चे पालन केले पाहिजे.”
पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत स्वराची भूमिका करणारी वृही कोडवारा म्हणते, “मला वृक्ष, झाडे आणि फुलपाखरे फार आवडतात! माझी आई म्हणते की पृथ्वी आपले घर असल्यासारखे आपण वागले पाहिजे. त्यामुळे मी नेहमी स्वच्छता ठेवते आणि पाणी वाया घालवत नाही. पृथ्वी दिनाच्या निमित्ताने सगळ्यांनी एक रोप लावावे तसेच दररोज निसर्गाची काळजी घ्यावी असे मला वाटते.”
वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से मालिकेत वंदनाची भूमिका करणारी परिवा प्रणती म्हणते, “एक आई, अभिनेत्री आणि नागरिक या नात्याने मला ठामपणे असे वाटते की, आपल्या पुढच्या पिढीला एक हरित, निरोगी पृथ्वी मिळावी ही आपली जबाबदारी आहे. वसुंधरा दिन आपल्याला या गोष्टीची स्मृती देतो की, प्रत्येक छोट्या छोट्या कृतीचा प्रभाव पडतो. मग ती कृती म्हणजे कचरा कमी करणे असो, पाणी काटकसरीने वापरणे असो किंवा एखादे झाड लावणे असो. बदलाची सुरुवात घरापासूनच होत असते. या बदलात योगदान देण्याची क्षमता आपल्या प्रत्येकात आहे.”
तेनाली रामा मालिकेत कृष्णदेवराय राजाची भूमिका करत असलेला आदित्य रेडिज म्हणतो, “कृष्णदेवराय राजासारख्या अत्यंत सुजाण आणि न्यायनिष्ठ व्यक्तीची भूमिका करत असताना मला सतत हे जाणवते की, आपल्या पूर्वजांनी निसर्गाचा किती मान ठेवला! आजच्या युगात आपण ती संतुलन आणि जबाबदारीची जाणीव पुन्हा जागृत केली पाहिजे. वसुंधरा दिन ही कोणतीही एक तारीख नाही- कृती करण्यासाठी सगळ्यांना केलेले ते आवाहन आहे. केवळ आपल्यासाठीच नाही, तर आपल्या भावी पिढ्यांसाठी चला आपण शाश्वत पद्धतींचा स्वीकार करू या.”