no images were found
जागृति – एक नई सुबह’ मध्ये ऑन-स्क्रीन शत्रू, पण ऑफ-स्क्रीन मस्त मित्र:
‘जागृति – एक नई सुबह’मध्ये कलिकांत (आर्य बब्बर) आणि आकाश (सागर पारेख) यांचे बाप–मुलाचे नाते तणाव आणि संघर्षाने भरलेले असले तरी कॅमेऱ्याच्या मागे मात्र त्यांचे नाते वेगळेच आहे. सेटवर ही जोडी हसून, धमाल करुन मजेत आणि अगदी मोकळ्या क्षणांसह दिवसाला रंगतदार बनवते.
सागर आणि आर्य यांच्यामध्ये गहिरी मैत्री झाली असून ते दोघे कायम धमाल मस्ती करत असतात आणि जे सेटवरील कामालाच ते मजेदार बनवतात. त्यांच्या व्यक्तिरेखा पडद्यावर एकमेकांशी सतत संघर्ष करतात, पण पडद्यामागे मात्र त्यांची दोस्ती हास्य आणि धमाल क्षणांनी भरलेली असते. त्यामुळेच चित्रीकरणाचे दीर्घ तासही सहजपणे पार पडतात. सागरने आपल्या सोशल मीडियावर आपले हे नाते अगदी सहज आणि जिवंत असल्याचे म्हटले आहे. तो म्हणतो की त्याला अनेकदा केवळ आर्यच्या ऊर्जेने उत्साही वाटते. आणि मग अचानक त्यांच्यातील डान्स ब्रेक्स आणि झकास विनोद यांमुळे संपूर्ण सेटचे वातावरणच प्रसन्न होते.
सागर पारेख म्हणाला, “ऑनस्क्रीन आर्य सर आणि मी बाप–मुलाच्या रूपात नेहमी एकमेकांशी भिडत असतो, पण कॅमेऱ्याच्या मागची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. त्यांच्यासोबत काम करणे नेहमीच आनंददायी असते – त्यांची एनर्जी जबरदस्त आहे आणि ते सेटवर असले की कधीच कंटाळा वाटत नाही. कधी अचानक एखादा विनोद, कधी अचानक नाचायला सुरुवात – ते सेटवर एक वेगळीच उत्साही झळाळी आणतात. आम्ही दोघे एकमेकांची थट्टा करत राहतो, टेक्सच्या मध्ये हसतो आणि मग अशा धमाल क्षणांमध्ये कामही अगदी खेळासारखं वाटू लागते. खूप कमी लोक असतात जे गंभीर सीनमधून उतरुन थेट धमाल करु शकतात – आर्य सर हे अगदी सहजपणे करतात.”
एकीकडे सागर आणि आर्य यांची ऑफस्क्रीन दोस्ती झाली असून दुसरीकडे ऑनस्क्रीन कहाणीत तणाव आणखी वाढणार आहे. जेव्हा आकाशला कळेल की जागृति (रचना मिस्त्री) ही कोणी दुसरी नसून त्याचीच मैत्रीण जग्गू आहे, तेव्हा परिस्थिती बदलेल. आकाश आणि जागृति मिळून कलिकांतच्या धोकादायक कारस्थानांपासून चित्ता समुदायाला वाचवू शकतील का?