Home शासकीय शहरात स्वच्छता मोहिमेअंतर्गत 30 टन कचरा उठाव

शहरात स्वच्छता मोहिमेअंतर्गत 30 टन कचरा उठाव

9 second read
0
0
38

no images were found

शहरात स्वच्छता मोहिमेअंतर्गत 30 टन कचरा उठाव

 

कोल्हापूर : शहरामध्ये पूर ओसणा-या भागामध्ये महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर स्वच्छता व औषध फवारणी करण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज 30 टन गाळ, फ्लोटींग मटेरियल व कचरा उठाव करण्यात आला आहे. यातील 20 टन वाहता कचरा दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर रोडवरील सुतारवाडा येथील नाल्यातून काढण्यात आला आहे. या ठिकाणी हा कचरा 6 आयवा डंपरद्वार उठाव करण्यात आला आहे. तर इतर कचरा जामदार क्लब, सुतारवाडा, पंचगंगा तालीम परिसर, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मी नाराण मंदिर, जयंती नाला पंपीग स्टेशन, सीता कॉलनी, नाईक मळ, कारजगेमळा, रमणमळा मळा, जाधववाडी, कदमवाडी, कुंभार गल्ली, रिलायन्स मॉल, कामगार चाळ, दुधाळी गवत मंडई, सुतारावाडा, कलेक्टर ऑफिस, बापट कॅम्प, मोकाशी पॅसेज, चावरे पॅसेज, सिध्दार्थ नगर या परिसरातून उठाव करण्यात आला आहे. यासाठी 5 जेसीबी, 6 आयवा डंपर, 2 फायर फायटर, 2 पाण्याचे टँकर, औषध फवारणीचे 9 टॅक्टर, पाणी फवारणीचे 2 टॅक्टर, धूर फवारणीची 9 मशिन व 20 हॅन्ड पंप व महापालिकेच्या 300 सफाई कर्मचा-यामार्फत राबविण्यात आली.

          हि मोहिम प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्‍य निरिक्षक जयवंत पवार व सर्व आरोग्य निरिक्षक यांनी राबविली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…