
no images were found
सेवा निवृत्त अधिकारी व जवांनासाठी परीसंवाद मेळावा
कोल्हापूर : ले. जनरल विनोद जी खंडारे, PVSM, AVSM, SM (Retd), Principal Advisor, रक्षा मंत्रालय हे शनिवार दिनांक १२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ ते १२.३० वाजता या दरम्यान कोपार्डे, सिध्दीविनायक हॉल, तालुका- करवीर, जिल्हा कोल्हापूर येथे परिसंवाद मेळावा घेण्यार आहे. तरी करवीर, पन्हाळा व गगनबावडा, कागल तालुकातील सर्व सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व युध्द विधवा यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.