Home शासकीय अयोध्येमधील चौकाला लता दीदींचे नाव

अयोध्येमधील चौकाला लता दीदींचे नाव

0 second read
0
0
35

no images were found

अयोध्येमधील चौकाला लता दीदींचे नाव

अयोद्धेमध्ये आज चौकाला लता दीदींचे नाव दिले जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती राहील.

आज स्वर कोकिळा लता मंगेशकर यांची जयंती आहे. लता मंगेशकर यांचे या वर्षी 6 फेब्रुवारी रोजी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ‘परिचय’, ‘कोरा कागज’ आणि ‘लेकिन’साठी त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देशातील अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

महान गायिका लता मंगेशकर यांना त्यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी, उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील एका मोठ्या चौकात 14 टन आणि 40 फूट वीणा पुतळा बसवण्यात आला असून. पंतप्रधान मोदी या चौकाचे आज उद्घाटन करतील. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय पर्यटन मंत्री या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आज स्वर कोकिळा लता मंगेशकर यांची जयंती आहे.

राम कथा उद्यानात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. याप्रसंगी थोर संत महंत व लोकप्रतिनिधींनाही जिल्हा प्रशासनाकडून निमंत्रित करण्यात आले आहे

‘मला खूप काही आठवतंय…असंख्य संभाषणे ज्यात त्यांनी खूप आपुलकीचा वर्षाव केला. आज अयोध्येतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात येत आहे, याचा मला आनंद आहे. महान भारतीय व्यक्तिमत्वाला ही खरी श्रद्धांजली आहे.’ पंतप्रधान मोदींनी लता मंगेशकर यांच्या जयंती दिनी अभिवादनपर ट्विट केले आहे, लतादीदींना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…