
no images were found
अज्ञातांकडून गोळीबारात तरुण ठेकेदार गंभीर
पारनेर: तालुक्यातील मांड ओहोळ – म्हसोबा झाप रोडवर स्वप्निल जयसिंग आग्रे (वय २५, रा. म्हसोबा झाप) या तरुण शासकीय ठेकेदारावर मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसमांकडुंन गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे.
स्वप्निल आग्रेला टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान गोळीबार करणारे फरार झाले आहेत. ही घटना कशामुळे घडली याचा तपास पारनेर पोलिस करत आहेत.