Home धार्मिक “जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे श्री दुर्गादेवी स्वरूपात अलंकार महापूजा दर्शन.”

“जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे श्री दुर्गादेवी स्वरूपात अलंकार महापूजा दर्शन.”

0 second read
0
0
63

no images were found

आज अश्विन शुक्ल *द्वितीया, शुभकृत् नाम संवत्सर शालिवाहन शके १९४४, मंगळवार दिनांक *२७ सप्टेंबर २०२२, शारदीय नवरात्रौत्सवाचा द्वितीय दिवस.
“जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे श्री दुर्गादेवी स्वरूपात अलंकार महापूजा दर्शन.”

आज दिनांक 27 सप्टेंबर 2022 शारदीय नवरात्र महोत्सवाच्या आजच्या द्वितीया तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई अष्टभुजा सिंह वाहिनी दुर्गेच्या रूपात सजली आहे दुर्गा म्हणजे दुर्गम असुराला मारणारे जगदंबेचे स्वरूप महात्म्याच्या अकराव्या अध्यायात देवीने स्वतःच्या भविष्यात्मक अवतारांचा उल्लेख केला आहे त्या वेळेला पुढे दुर्गमसुराला मारल्यानंतर माझे नाव दुर्गा म्हणून प्रसिद्ध होईल असे वचन देवीने स्वतः दिलेले आहे या स्वरूपात भगवती अष्टभुजा धारण करून सिंहावरती विराजमान आहे हातामध्ये शंख चक्र खड्ग धनुष्य बाण वरद कमळ त्रिशुळ तलवार आदी आयुधं धारण करीत असते दुर्गा या नावाने आदिशक्तीच्या दुस्तर म्हणजे अवघड गोष्टींना सुद्धा सोपं करणारी या रूपाचा बोध होतो. आजच्या द्वितीया तिथीला जगदंबेचे हे देवी कवचात वर्णन केलेल्या नवदुर्गांनी युक्त अष्टभुजा स्वरूप साकारले आहे अनिलराव कुलकर्णी आशुतोष कुलकर्णी श्रीनिवास जोशी आणि गजानन मुनीश्वर यांनी.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…