no images were found
सेवानिवृत्त शिक्षकाकडे फंडाची रक्कम मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या लिपिकावर गुन्हा
कोल्हापूर : सहायक शिक्षकाचे भविष्य निर्वाह निधीचे प्रस्तावाचे कामकाज लवकर पूर्ण करून घेण्यासाठी 23 हजारांची लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिकावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तम बळवंत कांबळे (वय 46), नेमणूक अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक हत्तीमहल, सोमवार पेठ, कोल्हापूर असे त्याचे नाव आहे. तक्रारदार शिक्षक 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. तक्रारदार शिक्षकांनी भविष्य निर्वाह निधीतील रक्कमेसाठी किणी हायस्कुलकडे अर्ज दिला होता. त्या अर्जावर प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय हत्तीमहल,कोल्हापूर या कार्यालयास पाठविण्यात आला होता. त्याचा पाठपुरावा करताना उत्तम कांबळेची भेट झाली. क्लार्क उत्तम कांबळे याने भविष्य निर्वाह निधीचे प्रस्तावाचे कामकाज लवकर पूर्ण करून साहेबांची सही घेण्यासाठी 25 हजार लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर तक्रारदार शिक्षकांनी 22 ऑगस्ट रोजी लाचलूचपत विभागाकडे तक्रारी दाखल केली होती. लाच मागणीबाबत 23 ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता तक्रारदाराकडे उत्तम कांबळेने 23 हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.