Home Uncategorized दिलखुलास’ कार्यक्रमात धुळे जिल्ह्याच्या स्वीपच्या नोडल अधिकारी  डॉ. संगीता नांदुरकर यांची मुलाखत

दिलखुलास’ कार्यक्रमात धुळे जिल्ह्याच्या स्वीपच्या नोडल अधिकारी  डॉ. संगीता नांदुरकर यांची मुलाखत

27 second read
0
0
35

no images were found

दिलखुलास कार्यक्रमात धुळे जिल्ह्याच्या स्वीपच्या नोडल अधिकारी  डॉ. संगीता नांदुरकर यांची मुलाखत

 

            मुंबई: दि, ९ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळे महानगरपालिकेच्या स्वीपच्या नोडल अधिकारी तथा धुळे महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही  मुलाखत गुरुवार १६ मे, २०२४ रोजी, आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक रोशन जाधव यांनी घेतली आहे.

             धुळे जिल्ह्यात पाचव्या टप्पात लोकसभेसाठी मतदान होत आहे. या मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी राबविण्यात आलेले विविध जनजागृतीपर उपक्रम, बैठका, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार, ग्रामीण व शहरी भागात राबवलेले विशेष उपक्रम, युवा मतदार यांना केलेले आवाहन अशा विविध उपक्रमांविषयीची माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून डॉ. नांदुरकर यांनी दिली आहे.

Load More Related Articles

Check Also

विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा – मीना शेंडकर -डी. वाय. पाटील विद्यानिकेतन येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात 

विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा – मीना शेंडकर -डी. वाय. पाटील विद्यानिके…