
no images were found
श्री रेणुका देवीचा (भंडारा) लग्न सोहळा उत्साहात संपन्न
गांधीनगर(प्रतिनिधी) : गांधीनगर येथील कोयना कॉलनी येथे श्री रेणुका देवीचा लग्न सोहळा (भंडारा ) आज दिनांक 14 मे 2024 रोजी अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला.सकाळपासून अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता देवीला अभिषेक घालण्यात आला यानंतर षोडशोपचारे देवीची पूजा बांधण्यात आली. हलगीच्या निनादात मुहूर्तमेढ,लिंब,हळदीचा कार्यक्रम झाला. दुपारी सव्वा बारा वाजता अक्षतारोपण करण्यात आले .12.30 ते 4 वाजेपर्यत महाप्रसादास वाटप कऱण्यात आले.
सुमारे 700 हुन आधिक लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गाडेगोंडवाडी येथील सखुआक्का मिठारी यांनी सुती – चौंडक्याच्या गजरात अनेक रेणुका देवीची भक्ती गीत गायली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री रेणुका भक्त मंडळाकडून करण्यात आले होते.