
no images were found
भारत-पाकिस्तान सीमेवर गुरुदासपूरमध्ये ड्रोनची घुसखोरी
नवी दिल्लीः गुरुदासपूर सीमेवर पहाटेच्या सुमारास बीएसएफ जवानाला घुसखोरी करणारा हा पाकिस्तानी ड्रोन दिसला होता. सीमेवरील बीओपी 89 कॉर्प्सच्या परिसरात ही भारताच्या हद्दीत ड्रोनकडून ही घुसखोरी करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोनची घुसखोरी सारख्या कुरघोड्या चालूच आहेत. गुरुदासपूरमध्ये आज सकाळी पुन्हा एकदा ड्रोनने सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी बीएसएफ जवानांनी ड्रोनकडून होणारी घुसखोरी हाणून पाडण्यात यश मिळविले. या घटनेमुळे पोलीस आणि बीएसएफच्या जवानांकडून संपूर्ण परिसराची पाहणी चालू असून या घुसखोरीमागील कोणतेही कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.
त्यावेळी तेथे कर्तव्यावर असलेल्या जवान आणि कॉन्स्टेबल योगेंद्र यांनि ड्रोनवर गोळीबार करत त्यानंतर त्यावर दोन हलके बॉम्बही फेकण्यात आले. या प्रहारामुळे वरती आलेला ड्रोन पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने परतला. या घटनेनंतर पोलीस आणि बीएसएफ जवान अधिक सतर्क झाले असून या परिसरात जोरदार शोधमोहीम राबविण्यात येत आहे. पंजाब सीमेवर पाकिस्तानकडून यापूर्वीही ड्रोन पाठवून घुसखोरीचे अनेक प्रयत्न झालेले आहेत सीमेपलीकडून या बाजूला येणारे ड्रोन हे सैनिक तैनात असलेल्या जागेची पाहणी करण्याकरिता पाठवले जातात असंही सांगण्यात आले आहे. सध्या ड्रोन हा घुसखोरी करण्यासाठी महत्वाचे साधन बनले आहे.
एवढेच नाही तर सीमेपलीकडून ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करीही या ड्रोनद्वारे केली जात असून जम्मू-काश्मीरमध्येही पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भागात या ड्रोनद्वारे दहशतवादी संघटनांना रोख रक्कम आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुरुदासपूरमध्ये आज सकाळी पुन्हा एकदा ड्रोनने सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी बीएसएफ जवानांनी ड्रोनकडून होणारी घुसखोरी हाणून पाडण्यात यश मिळविले.