
no images were found
“अजित पवार धमकी बहाद्दर, रोज उठून…” संजय राऊत यांचा आरोप,
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. अशात संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार हे धमकी बहाद्दर आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझा सवाल आहे की तुम्ही आमचे बारा लोक घेतले त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. सगळे भ्रष्टाचारी मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचार विरोधी कारवाई करत आहेत. मोदींनी आधी अजित पवारांवर कारवाई केली पाहिजे.अजित पवारअपघाताने मोठे झालेले नेते आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान काय? “असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवार धमकी बहाद्दर आहेत असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी २०१९ मध्ये शरद पवारांनी सांगितलं म्हणूनच भाजपासह गेलो असं सांगितलं. पडद्यामागच्या हालचालीही सांगितल्या. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “किती दिवस या सगळ्या गोष्टी सांगणार? हे सगळं गुळगुळीत झालं आहे. दुसरं काहीतरी बोला, धमकी वगैरे द्या. अजित पवारांची ख्याती ही धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून मतदारसंघातल्या १० जणांना ते धमक्या देतात. त्यांनी वैचारिक वक्तव्यं करु नयेत त्यांना ती शोभत नाहीत.” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.