
no images were found
अली हसनचे जटिल पिता पुत्र डायनॅमिक करण वोहरासोबत मालिका ‘मैं हूँ साथ तेरे’मध्ये
झी टीव्हीवरील आगामी मालिका ‘मैं हूँ साथ तेरे’ ही प्रेक्षकांना जान्वी (उल्का गुप्ता) ह्या एका सिंगल आईच्या आयुष्यप्रवासावर घेऊन जाणार आहे, जिथे एक आई म्हणून आपली जबाबदारी निभावताना तिला वडिलांच्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. ह्या मालिकेत जान्वी आपला मुलगा नकिआ (निहान जैन) सोबत ग्वाल्हेर येथे राहते आणि तोच तिचे विश्व आहे. त्यांचे नाते अतिशय दृढ असले तरी घरामध्ये एका पुरूषाची कमी किआनला जाणवते, पण ते त्याच्या स्वतःसाठी नाही तर त्याच्या आईच्या दृष्टीने. जेव्हा जान्वीची ओळख एका समृद्ध व्यावसायिक आर्यमनसोबत होते तेव्हा ह्या कथेमध्ये आणखी रंगत येईल. ते दोघे एकाच छताखाली एकत्र काम करतात. पहा किआनला त्याच्या सिंगल आईला तिच्यावर प्रेम करणाऱ्या पुरूषाच्या जवळ आणण्यासाठी भूमिका बजावताना…
ह्या मालिकेबद्दल अतिशय उत्साहात असलेला नावाजलेला टेलिव्हिजन अभिनेता अली हसन याचीही ह्या मालिकेत भूमिका आहे. तो नायक आर्यमनचे पिता ब्रिज प्रताप सिंग बुंदेलाची भूमिका साकारणार आहे. ते 60 वर्षांचे हॉटेलियर आणि एक यशस्वी व्यावसायिक आहेत. त्या दोघांचे नाते असे काही आहे की ब्रिजच्या मनात आर्यमनबद्दल तीव्र नाराजी आहे. आर्यमनला त्याच्या आणि त्याच्या वडिलांमधील हा दुरावा कमी करायचा असला तरी ब्रिजची मुलगी रैना (मानसी श्रीवास्तव) काही ना काही कारण काढून कायम ब्रिजला आर्यमनच्या विरोधात नेते. ब्रिजच्या उपस्थितीमुळे ह्या मालिकेत अनेक नाट्यमय वळणे अपेक्षित आहेत. अलीसुद्धा आपल्या नवीन आणि मॉडर्न लूकबद्दल अतिशय उत्साहात आहे.
अली हसन म्हणाला, “मैं हूँ साथ तेरे’च्या कलाकारांसोबत सामिल होण्यासाठी मला खूप छान वाटतंय आणि माझी व्यक्तिरेखा ब्रिजमुळे तर आर्यमन आणि जान्वी यांच्या आयुष्यात अनेक चढउतार येतील. ही व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी अतिशय नवीन आहे कारण यात बापलेकाचे गहन नाते दर्शवण्यात आले आहे. ह्या मालिकेत माझा लूकही अतिशय वेगळा असून प्रेक्षक यात मला प्रथमच लांब केस, मॅन बन (अंबाडा) आणि पांढरी दाढी अशा रूपात पाहतील. मी हा नवीन प्रवास सुरू करण्यासाठी सज्ज आहे आणि माझे सर्वकाही ह्या भूमिकेला देईन. माझ्या चाहत्यांनी नेहमीच माझ्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी माझ्यावर प्रेम केले आहे. मला आशा आहे की आताही ते माझ्यावर आपल्या प्रेम आणि आशीर्वादाची बरसात करतील.” अली तर ह्या भूमिकेसाठी अतिशय रोमांचित असून झी टीव्हीवरील ह्या मालिकेत प्रेम, आयुष्य आणि नातेसंबंधांकडे निरागस दृष्टीने पाहण्यासाठी सज्ज व्हा.