Home शासकीय जनगणनेचे काम निर्धारीत वेळेत आणि अचूक करा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

जनगणनेचे काम निर्धारीत वेळेत आणि अचूक करा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

8 second read
0
0
30

no images were found

जनगणनेचे काम निर्धारीत वेळेत आणि अचूक करा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

कोल्हापूर,: केंद्र शासनाच्या वतीने लवकरच जनगणनेच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचे नियोजन करण्यासाठी जनगणनेची माहिती अत्यंत उपयुक्त ठरते, त्यामुळे ही माहिती निर्धारीत वेळेत तयार करुन, शंभर टक्के अचूक असावी याची काळजी प्रगणकांनी घ्यावी. प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर काम करताना ही माहिती विहित कालमर्यादेत आणि अत्यंत सावधगिरीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जनगणनेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.

        यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हा जनगणना कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात घरांची यादी करणे आणि घरगणना करणे अपेक्षित असून, फेब्रुवारी २०२७ पासून जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील नियोजित कार्यक्रमाला प्रारंभ होईल. जनगणनेच्या कामात पारदर्शकता राखणे आवश्यक असून, माहिती संकलित करताना कोणताही भाग सुटू नये अथवा त्या भागाची पुनरावृत्ती होऊ नये याची विशेष दक्षता घेण्यात यावी. जर जनगणनेची माहिती चुकीची असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. निवडणूक कार्यक्रमानंतर प्रशिक्षणांसह प्रत्यक्ष कामाला अधिक गती देण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.

        या कार्यशाळेत जनगणना सहाय्यक संचालक अजय ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जलद आणि अचूक जनगणनेसाठी ग्रामीण भागातील महसुली हद्द विचारात घेऊन ७०० ते ८०० लोक किंवा १८० ते २०० घरांचा एक गट तयार करावा. शहरी भागात प्रगणकांनी विभागानुसार (वॉर्डनुसार) लोकसंख्या मोजावी. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी सूचना दिली की, १० फेब्रुवारीपासून प्रगणक गट तयार करण्याच्या कामाला सुरुवात करून आवश्यक मनुष्यबळाचा आराखडा तयार करावा. नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांनी आजपासूनच या कामाला सुरुवात करावी, असेही त्यांनी नमूद केले.

       या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी बर्डे-चौगुले, इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, जनगणना सहाय्यक संचालक अजय ठाकूर, जिल्हा समन्वयक मयूर पवार, उपसंचालक (सांख्यिकी) सीमा अर्दाळकर, करमणूक कर अधिकारी तेजस्विनी पाटील, करवीरचे तहसीलदार स्वप्निल पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील आणि जिल्ह्यातील इतर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…