Home मनोरंजन अटल’मध्‍ये अभिनेता माधव अभ्‍यंकर खलनायक ‘सुदर्शन त्रिपाठी’ची भूमिका साकारणार

अटल’मध्‍ये अभिनेता माधव अभ्‍यंकर खलनायक ‘सुदर्शन त्रिपाठी’ची भूमिका साकारणार

1 min read
0
0
24

no images were found

अटल’मध्‍ये अभिनेता माधव अभ्‍यंकर खलनायक ‘सुदर्शन त्रिपाठी’ची भूमिका साकारणार

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘अटल’ नवीन खलनायक सुदर्शन त्रिपाठीला सादर करण्‍यास सज्‍ज आहे, जो अटल बिहारी वाजपेयीच्‍या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावेल. अनेक यशस्‍वी मराठी मालिका व नाटकांमध्‍ये काम केलेले माधव अभ्‍यंकर यांना ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्‍यासाठी निवडण्‍यात आले आहे. खलनायक म्‍हणून त्‍यांची भूमिका यंग अटलच्‍या (व्‍योम ठक्‍कर) जीवनात नवीन अडथळे व आव्‍हाने निर्माण करेल. आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना माधव अभ्‍यंकर ऊर्फ सुदर्शन त्रिपाठी म्हणाले, ”मालिकेमध्‍ये मी शिस्‍तबद्ध पंडित सुदर्शन त्रिपाठीची भूमिका साकारणार आहे, जो सामाजिक दर्जा, जात व धर्म यावरील त्‍याच्‍या अति-पुराणमतवादी मतांसाठी ओळखला जातो. सुदर्शनचा परंपरा व तत्त्वांवर दृढ विश्‍वास आहे, तो स्थिरता, सातत्‍यता व नैतिकतेला महत्त्‍व देतो. तो पिढ्यानपिढ्या चालत असलेल्‍या चालीरिती व नैतिकतेमधून शिकवण घेतो. ग्‍वाल्‍हेरच्‍या समुदायाचा प्रतिष्ठित अध्‍यक्ष म्हणून तो आदेशाचे पालन करण्‍याला प्राधान्य देतो, संस्‍कृतीचे जतन करतो आणि नैतिक मूल्‍ये जपतो, तसेच तत्त्वांचे पालन करतो. ब्रिटीश अधिकारी व स्‍थानिक रॉयल्‍टी यांच्‍यासाठी तो बहुमूल्‍य सोबती आहे. प्रेक्षकांना माझ्या यापूर्वीच्‍या खलनायकाच्‍या भूमिका माहित असतील पण एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘अटल’मधील सुदर्शन त्रिपाठीची भूमिका अधिक प्रखर असेल. माझ्या मते, ही भूमिका प्रेक्षकांना नवीन पैलू देईल.”

एपिसोडमध्‍ये आपल्‍या भूमिकेच्‍या प्रवेशाबाबत सांगताना अभिनेता पुढे म्‍हणाले, ”मालिकेमध्‍ये रामनवमी साजरीकरणादरम्‍यान माझा प्रवेश होईल. विवाह टाळत शिक्षण सुरू ठेवण्‍यासाठी अटलची (व्‍योम ठक्‍कर) मदत घेतलेल्‍या नितीसोबत कृष्‍णा देवी व अटल मोहल्‍लामधील रामनवमी पूजेसाठी येतात. नितीचे आईवडिल सुदर्शन त्रिपाठीकडे मदत मागतात. सुदर्शन त्रिपाठी जरा देखील वेळ वाया घालवत नाही. तो त्‍वरित विवाहाची तयारी करण्‍याचा आदेश देतो आणि श्‍याम बिहारीला (मिलिंद दस्‍ताने) लग्‍नाच्‍या विधी सुरू करत नितीसोबत विवाह करण्‍यास सांगतो. तो अटल आणि उपस्थितांसमोर विवाह विधी होण्‍याची खात्री घेतो, ज्‍याचा सर्वांना धक्‍का बसतो. अटल नितीला मदत करू शकेल का आणि तिला विवाह होण्‍यापासून वाचवू शकेल का? आता, अटल नितीच्‍या आईवडिलांना तिचे शिक्षण सुरू ठेवण्‍यास मदत करण्‍यासाठी कशाप्रकारे समजावेल?”   

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…