Home मनोरंजन शूटिंगच्या मधल्या वेळेत रंगते अभिनेता यश पंडित आणि वसीम मुश्ताकचे गाणे-बजावणे!

शूटिंगच्या मधल्या वेळेत रंगते अभिनेता यश पंडित आणि वसीम मुश्ताकचे गाणे-बजावणे!

6 second read
0
0
19

no images were found

शूटिंगच्या मधल्या वेळेत रंगते अभिनेता यश पंडित आणि वसीम मुश्ताकचे गाणे-बजावणे!

सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ ही शर्मा कुटुंबाची कहाणी आहे. जयदेव शर्मा (महेश ठाकूर) आणि त्याच्या तीन मुली दीपिका (नीता शेट्टी), तन्वी (अदिती राठोड) आणि सर्वात धाकटी पल्लवी (आयुषी खुराना) असे हे शर्मा कुटुंब आहे. पडद्यावर या तीन बहिणी आपापल्या जीवनातील आव्हानांना धीराने तोंड देतात तेव्हा त्यांची कथा रंगते, पण पडद्याच्या मागे मात्र पडद्यावर त्यांच्या पतीची भूमिका करणारे कलाकार सेटवरचे वातावरण सुरेल करत असतात!

तन्वीच्या पतीची राकेशची भूमिका करणारा यश पंडित आणि दीपिकाच्या पतीची वरुणची भूमिका करत असलेला वसीम मुश्ताक या दोघांना संगीतात रुची आहे. वसीम तर एका गायन रियालिटी शोमध्ये भाग घेऊन आला आहे, तर यशचे घराणे लोकप्रिय गायकांचे घराणे आहे. शॉट्सच्या मधल्या वेळेत आणि विश्रांतीच्या वेळेत यश आपली गिटार काढतो आणि मग हे दोघे जण 80 आणि 90 च्या दशकातील बॉलीवूड गीते गातात. ही गाणी त्यांना विशेष प्रिय आहेत. त्यांचे सहकलाकार समर वेरमानी, आयुषी खुराना, नीता शेट्टी, अदिती राठोड, कशिश दुग्गल, सोनाली नाईक वगैरे त्यांचे श्रोते बनून त्यांना दाद देतात.

वरुणची भूमिका करणारा वसीम मुश्ताक म्हणतो, “मी शाळेत असल्यापासून मला संगीत कलेत रुची आहे आणि माझी ही आवड आजही जिवंत आहे. कॉलेज बॅन्डमध्ये गाण्यापासून ते कव्हर सॉन्ग बनवण्यापर्यंत अनेक प्रकारे गायन माझ्या आयुष्याचा भाग बनले आहे. सेट्सवर सुद्धा यश आणि इतरांना गाण्याचे जे वेड आहे, ते पाहून छान वाटते. आम्ही बऱ्याचदा एकत्र बसून गाणी गातो. त्यामुळे दिवसभर काम करून आलेला थकवा दूर होऊन निवांत वाटते. आमच्यातले नाते केवळ सह-कलाकार असण्यापुरते राहिलेले नाही. यश तर माझे कुटुंबच झाला आहे. आम्ही केवळ संगीत नाही, तर शायरी, गझल्स सुद्धा शेअर करतो. ज्यांच्या बरोबर मी गझल गायचो, त्या माझ्या वडिलांना तर कधी कधी मी सांगतो की, मी यश शिवाय इतर कोणाही बरोबर गाणार नाही!”

राकेशची भूमिका करत असलेला यश पंडित म्हणतो, “वसीम आणि मला गाण्याचे वेड आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आम्ही दोघे एकत्र गात असतो. आमचे सह-कलाकार नीता, कशिश, आयुषी, अंकित आणि ‘आंगन – अपनों का’ शी निगडीत सर्व जण आमची गाणी ऐकताना रंगून जातात. शूटिंगच्या मधल्या वेळेत आम्ही अशाप्रकारे गाण्यातून मस्ती आणि आनंद मिळवतो. शूटिंगच्या धकाधकीत संगीत हा मन प्रफुल्लित करण्याचा उत्तम उपाय आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…