
no images were found
जे.सी.बी मशीनद्वारे व मनुष्यबळाव्दारे नाल्यांची सफाई
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात मान्सुपुर्व नालेसफाईचे काम सुरु केले आहे. यामध्ये 2 जे.सी.बी मशीनद्वारे मध्यम 206 नाल्यांपैकी 62 नाल्यांची व मनुष्यबळाव्दारे 476 नाल्यापैकी 210 नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. तर पोकलॅण्ड मशीनद्वारे आज अखेर 637 डंपर गाळ उठाव करण्यात आला आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले हॉस्पीटल ते महालक्ष्मीनगर, वर्षानगर ते मनोरा हॉटेल, सुतारवाडा, गाडी अड्डा ते लक्ष्मीपूरी, यादवनगर ते हुतात्मा पार्क येथून मुख्य नाल्यांची सफाई पोकलॅण्ड मशिनद्वारे करण्यात येत आहे.
आरोग्य विभागामार्फत शहरातील मुख्य 13 नाल्यांची महानगरपालिकेच्या 2 पोकलॅण्ड मशीनद्वारे सफाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर 2 जे.सी.बी मशीनद्वारे शहरातील मुक्त सैनिक वसाहत, कदमवाडी, कसबा बावडा, 100 फुटी रोड, बोंद्रेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कात्यानी कॉम्प्लेक्स, राजारामपूरी 1 ली गल्ली येथील 62 नाल्यांची सफाईचे करण्यात आली आहे. तर मनुष्यबळाव्दारे तपोवन, टाकाळा, टेंबालाईवाडी, मंगेशकरनग, शिवाजी पार्क, लक्षतीर्थ वसाहत, लाईन बझार, फुलेवाडी, रंकाळा स्टॅन्ड, विक्रमनगर, कसबा बावडा पूर्व, भोसलेवाडी, कदमवाडी, महाडिक वसाहत, सदर बाजार, मुक्त सैनिक वसाहत, रुईकर कॉलनी, साईक्स एक्स्टेंशन, राजारामपूरी 1 ते 5 गल्ली, वर्षा नगर, राजेंद्रनगर, सिद्धाळा गार्डन, तटाकडील तालीम, संभाजीनगर, सानेगुरुजी वसाहत, साळोंखेनगर, शायकीय मध्यवर्ती कारागृह परिसर, रायगड कॉलनी- जरगनगर, सुर्वेनगर, तुळजाभवानी कॉलनी, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, जिवबानाना जाधव पार्क येथील 38 प्रभागातील चॅनेलची स्वच्छता करण्यात आलेली आहे.
सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांची व्हीनस कॉर्नर कल्याण ज्वेलर्स मागील बाजूस नाले सफाईच्या कामाची पाहणी
आज दुपारी 4 वाजता सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी व्हीनस कॉर्नर कल्याण ज्वेलर्सच्या मागील बाजूस चालू असलेल्या नाले सफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या ठिकाणी नाले सफाईतून काढण्यात आलेल्या 80 डंपर गाळ लवकरात लवकर उठाव करण्याच्या सूचना किटक नाशक अधिकारी स्वप्नील उलपे यांना दिल्या. त्याचबरोबर या नाल्याच्या पात्रालगत येथील फरशी व्यवसाईकाने त्याचे वेस्टेज येथे टाकल्याचे निदर्शनास आल्याने फरशी व्यवसाईकाने टाकलेले कटिंग तात्काळ उचलले नाही तर त्याच्यावरही कारवाई करण्याचे आदेश दिले. तर सर्व्हेअर अर्जुन कावळे यांना बोलवून या ठिकाणी केलेल्या अतिक्रमणाबाबत माहिती घेऊन संबंधीतांवर कारवाई करणेचे नर्देश दिले.