
no images were found
मानसी श्रीवास्तव साकारणार खलनायकी भूमिका
झी टीव्हीवरील आगामी मालिका ‘मैं हूँ साथ तेरे’ ही प्रेक्षकांना जान्वी (उल्का गुप्ता) ह्या एका सिंगल आईच्या आयुष्यप्रवासावर घेऊन जाणार आहे, जिथे एक आई म्हणून आपली जबाबदारी निभावताना तिला वडिलांच्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. ह्या मालिकेत जान्वी आपला मुलगा किआन (निहान जैन) सोबत राहते आणि तोच तिचे विश्व आहे. त्यांचे नाते अतिशय दृढ असले तरी घरामध्ये एका पुरूषाची कमी किआनला जाणवते, पण ते त्याच्या स्वतःसाठी नाही तर त्याच्या आईच्या दृष्टीने. जेव्हा जान्वीची ओळख एका समृद्ध व्यावसायिक आर्यमनसोबत होते तेव्हा ह्या कथेमध्ये आणखी रंगत येईल. ते दोघे एकाच छताखाली एकत्र काम करतात. पहा किआनला त्याच्या सिंगल आईला तिच्यावर प्रेम करणाऱ्या पुरूषाच्या जवळ आणण्यासाठी भूमिका बजावताना…
लोकप्रिय अभिनेत्री उल्का गुप्ता आणि हार्टथ्रॉब करण वोहरा ह्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असून त्यांच्यासोबत नावाजलेली टेलिव्हिजन अभिनेत्री मानसी श्रीवास्तवही दिसून येईल. ती आर्यमनच्या बहिणीची रैनाची भूमिका साकारत आहे. बुंदेला परिवारातील ती सगळ्यात धाकटी मुलगी असली तरी ती अतिशय महत्त्वाकांक्षी आहे आणि आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेते. पण ती आर्यमनचा तिरस्कार करते आणि बुंदेला परिवारातील काहीही मालमत्ता त्याला मिळू नये असे तिला वाटते कारण तो त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नातून झालेला मुलगा आहे. ह्या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा आर्यमनच्या आयुष्यात पुष्कळ भांडणे आणि जटिलता निर्माण करेल.
मानसी श्रीवास्तव म्हणाली, “कुंडली भाग्यमध्ये काम केल्यानंतर आता मी पुन्हा एकदा झी टीव्हीवर येत आहे आणि ‘मैं हूँ साथ तेरे’ मधील माझी भूमिका आणखी रोमांचक आहे. माझी व्यक्तिरेखा रैना आपल्या दुष्टपणाने प्रेक्षकांना त्यांच्या खुर्च्यांना खिळवून ठेवेल. तिचा लूक क्लासी आणि तिखट असून तिचे केस रेशमी आणि सरळ आहेत. ती डिजाईनर साड्या नेसते. ती अतिशय हक्काने वागते आणि आर्यमन तिचा सावत्र भाऊ आहे. त्यामुळे वारसा हक्काने त्याला काहीही मिळू नये असे तिला वाटते. ती नीच आहे आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकते. मी ह्या मालिकेसाठी चित्रीकरण करायला सुरूवात केली असून ही मालिका आणि माझी नवीन व्यक्तिरेखा यांना प्रेक्षकांची कशी प्रतिक्रिया लाभते हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.”
मानसी आपल्या भूमिकेबद्दल अतिशय उत्साहात असून प्रेम, आयुष्य आणि नातेसंबंधांकडे निरागस दृष्टीने पाहणे प्रेक्षकांसाठी रोचक ठरेल.