no images were found
“माझ्या व्यायामामुळे मला दिवसभराचा तणाव दूर करण्यास मदत होते.” सांगत आहे मनित जौरा आपल्या तंदुरूस्तीबद्दल
झी टीव्हीवरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’च्या प्रेक्षकांसाठी आता खूप साऱ्या रोमांचक गोष्टी असणार आहेत कारण ह्या मालिकेच्या प्रोमोजमध्ये सध्या दिसून येत असलेला मोहनच्या व्यक्तिरेखेतील शब्बीर आहलुवालिया राधिका (नीहारिका रॉय) आणि युग (मनित जौरा) यांच्या घरी एक वेगळी बारात घेऊन येताना दिसेल आणि तेव्हा त्याच्या हातात घटस्फोटाची कागदपत्रे असतील. ही बारात म्हणजे हे दाखवून देण्याचा त्याचा मार्ग आहे की राधिका ही दुसरीतिसरी कोणी नसून त्याची पत्नी राधा आहे आणि कायद्याने ते अजूनही विवाहीत आहेत. प्रेक्षकांनी अगोदरच युगच्या स्वभावाचे नकारात्मक पैलू पाहिलेले आहेत आणि मोहन करत असलेला हा तमाशा निश्चितपणे युगच्या रागामध्ये भरच घालणार आहे.
त्याची व्यक्तिरेखा युग ही पडद्यावर अतिशय खलनायकी असून त्या व्यक्तिरेखेपासून स्वतःला वेगळे ठेवण्याचा एक खास मार्ग मनितकडे आहे. मनित व्यायामाचे अतिशय शिस्तबद्ध वेळापत्रक पाळतो ज्यामुळे केवळ त्याच्या मनावरील तणावच हलका होत नाही तर त्याला व्यक्तिरेखेपासून स्वतःला वेगळे ठेवण्यासही मदत होते. आपले ‘रील’ आयुष्य केव्हा संपते आणि ‘रिअल’ आयुष्य केव्हा सुरू होते हे त्याला कळते.
मनित म्हणाला, “मला हे कळलं आहे की मानसिक आरोग्य हे व्यक्तीच्या शारीरिक आरोग्याशी अतिशय निकटपणे जोडलेले आहे. व्यायामाच्या वेळेस आपल्या शरीरात एन्डॉर्फिन्स रीलीज होतात आणि त्यामुळे दिवसभराचा तणाव दूर होण्यास मदत होते. माझ्यासाठी तंदुरूस्त राहणे हा पर्याय नसून ती एक मुलभूत गरज आहे. दिवसभरातील ते काही तास निव्वळ स्वतःसाठी समर्पित करण्यासाठी मी दररोज उत्सुक असते. ते ध्यान करण्यासारखे आहे, ज्यात मला माझे शरीर आणि त्याच्या गरजांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजते. मी जिमला जाते किंवा कधी धावायला किंवा चालायला जाते. त्यामुळे मला माझे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.”
मनितला फिट राहायला आवडत असताना, हल्लीच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की कसे राधा तिला जमेल तसे युगला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसऱ्या हाताला, राधाचे आयुष्य खडतर बनवण्यासाठी मोहन जमेल त्या संधीचा फायदा उठवत आहे कारण त्याला ती कुठल्याही परिस्थितीत हवी आहे. युग आता काय करेल? काय राधा स्वतःला त्याच्यापासून वाचवू शकेल?