no images were found
डी वाय. पाटील विद्यापीठ मेडिकल बायोटेक्नॉलॉजीच्या
विद्यार्थिनींची विविध कंपन्यामध्ये निवड
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-डी वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्ह्पुरच्या सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरी स्टडीज विभागातील एम.एस्सी. मेडिकल बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.
एम.एस्सी. मेडिकल बायोटेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी अमृता भोपळे हिची सेंट्रल लॅब बेंगळूर येथे मोलेक्युलर बायोलोजीस्ट म्हणून निवड झाली आहे. त्याचबरोबर तनया चव्हाण व श्रुती निकम (मोलेक्युलर बायोलॉजी लॅब, डी. वाय. पाटील हॉस्पिटल कोल्हापूर) शुभांगी देशमुख (ॲक्सेस हेल्थकेअर, पुणे) समृद्धी गायकवाड (अद्वि केमिकल, ठाणे) स्नेहल हजारे (सन फार्मा, औरंगाबाद) श्रद्धा कौलगी व प्रतीक्षा फडतरे (सेलोन लिमिटेड हैद्राबाद) अनघा कुलकर्णी (चेमटेस्ट लब, ठाणे) दिव्या लाड (बायोटेक, सांगली) नम्रता मुंगरवाड (डी.एम.एस डायग्नोस्टिक, पुणे) येथे निवड झाली आहे.
एम.एस्सी. मेडिकल बायोटेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रमात मोजक्याच विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात गेल्या अनेक वर्षापासून या माध्यमातून यशस्वी विद्यार्थी घडवले जात आहेत. रोग निदान, लस विकसित करणे, औषध निर्मिती अशा वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी जैविक आणि जैवतंत्रज्ञानाचा वापर महत्वपूर्ण असून विद्यार्थ्याना या क्षेत्रात प्रचंड मागणी आहे. वर्ष २०२४ -२५ साठी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.
या विद्यार्थ्याना रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ अर्पिता पांड्ये-तिवारी. डॉ. मेघनाद जोशी, डॉ. अश्विनी जाधव आणि डॉ. शिवाजी काष्टे यांचे मार्गदर्शन लाभले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे.