Home मनोरंजन बानीची प्रेरणादायक कहाणी स्वप्न पाहणाऱ्यांना आर्थिक अडथळ्यांवर मात करण्यास प्रोत्साहन देते

बानीची प्रेरणादायक कहाणी स्वप्न पाहणाऱ्यांना आर्थिक अडथळ्यांवर मात करण्यास प्रोत्साहन देते

9 second read
0
0
31

no images were found

बानीची प्रेरणादायक कहाणी स्वप्न पाहणाऱ्यांना आर्थिक अडथळ्यांवर मात करण्यास प्रोत्साहन देते

 

‘बादल पे पांव है’ ही बहुप्रतीक्षित मालिका गेल्याच आठवड्यात सोनी सबवर सुरू झाली आहे. त्यातील हृदयस्पर्शी कथानक आणि दमदार परफॉर्मन्समुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात मालिका यशस्वी ठरत आहे. सोशल मीडियावर या मालिकेची चर्चा आधीच सुरू झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रेक्षक अमनदीप सिद्धूने साकारलेल्या बानीच्या जगाकडे आकर्षित होत आहेत.

‘बादल पे पांव है’ ही बानी नामक एका धडाडीच्या तरुणीची लक्षवेधी कथा आहे, जिची स्वप्नं उंच आकाशात भरारी घेण्याची आहेत. आर्थिक दृष्ट्या सामान्य कुटुंबात वाढलेल्या बानीच्या महत्त्वाकांक्षा मात्र खूप मोठ्या आहेत. आहे त्या परिस्थितीच्या खूप वर जाण्याचा तिचा निर्धार आहे आणि हे केवळ तिच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर तिच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी तिला करायचे आहे. ‘आपल्याकडे आहे त्यात समाधान मानावे’ या पारंपरिक विचारसरणीचे संस्कार तिच्यावर झाले असले तरी, बानीची स्वप्नं मोठी आहेत आणि त्यासाठी ती प्रयत्न देखील करणार आहे. ही मालिका आपल्या प्रियजनांसाठी चांगले जीवनमान मिळवण्यासाठीचे बानीचे अथक प्रयत्न आणि तिची चिकाटी व महत्त्वाकांक्षा या विषयाभोवती फिरते.

बानीची भूमिका करत असलेली अमनदीप सिद्धू म्हणते, “‘बादल पे पांव है’ फक्त एक मालिका नाही; तो एक अनुभव आहे, ज्यामध्ये मोठी स्वप्नं बघण्याचे धाडस करणाऱ्या बानीसारख्या लोकांच्या आकांक्षा, संघर्ष आणि विजयाचे प्रतिबिंब आहे. बानीची महत्त्वाकांक्षा फक्त तिच्यापुरती नाही, तर आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आहे. तिचे वेगळेपण याच्यात आहे की, आपल्या कुटुंबासाठी ती काहीही करायला तयार आहे. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी बानी वेगवेगळी कामे करून पाहते. यातून तिचा निर्धार दिसून येतो. ती स्वार्थी किंवा लोभी नाही. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना ती इतरांचे नुकसान करत नाही. प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा आणि अधिक चांगले जीवन मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा सगळ्या लोकांसाठी बानी प्रेरणास्थान आहे. तिच्या जीवनाने घालून दिलेल्या मर्यादा तिला मान्य नाहीत आणि ती आपल्या कुटुंबासाठी अविरत प्रयत्न करत राहते, कारण त्यांना उत्तम जीवनमान प्राप्त करण्याचा अधिकार आहे असे तिला वाटते.”

‘बादल पे पांव है’ ही मालिका वेगवेगळ्या अंगाने प्रेक्षकांना जवळची वाटेल. आजच्या काळात अनेक लोक आर्थिक असुरक्षिततेशी झगडत आहेत आणि आपली स्वप्नं साकार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा काळात बानीची कहाणी जितकी या काळाशी संबद्ध आहे, तितकीच अनोखीही आहे. या मालिकेतून हे अधोरेखित केले आहे की, दृढनिश्चय आणि उद्दिष्टाची स्पष्टता असली तर कोणत्याही अडचणींवर मात करता येते.

आजच्या गतीशील जीवनात यशस्वी होण्याचा प्रचंड दबाव असताना बानीची कहाणी प्रोत्साहक ठरेल. आपले उद्दिष्ट स्पष्ट असण्यावर आणि मार्ग कितीही काटेरी असला तरी ध्येयावर लक्ष केंद्रित असण्यावर यात भर दिला आहे. ज्यांनी आयुष्यात अपयशाचा सामना केला आहे आणि खूप कष्ट केले आहेत अशांसाठी बानीची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि संकटातून मार्ग काढण्याची तिची क्षमता प्रेरणादायक ठरू शकते. तिचा प्रवास अडथळ्यांवर विजय मिळवण्याची मानवी क्षमता आणि चिकाटीच्या ताकदीची साक्ष देते.

मुळात ‘बादल पे पांव है’ ही मालिका मानवी मनाच्या लवचिकतेचा, त्याच्या चिकाटीचा आढावा घेते. यातील नायिका बानी म्हणजे आजच्या युगातील लोकांचा संघर्ष आणि त्यांच्या आकांक्षांचे प्रतीक आहे. तिचा प्रवास हा तिच्या वैयक्तिक यशाविषयी नाही. तिच्या प्रवासातून समाजातील मोठमोठ्या आव्हानांचे प्रतिबिंब दिसते. आर्थिक अनिश्चितता हे अनेक लोकांच्या जीवनातील वास्तव आहे. आपल्या परिस्थितीच्या वर जाण्याचा बानीचा दृढनिश्चय आशेचा किरण दाखवतो. तिची कहाणी आपल्याला या गोष्टीचे स्मरण करून देते की, स्वप्नं कितीही मोठी आणि अशक्यप्राय वाटत असली तरी चिकाटी आणि सातत्याने ती साध्य करता येऊ शकतात.

मालिकेचे कथानक उलगडत असताना बानी कशी हळूहळू मोठी होत जाते, कुटुंबाची परिस्थिती कशी बदलत जाते हे पाहताना प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा मिळेल. ही मालिका नक्कीच प्रेक्षकांना खिळवून ठेवेल आणि प्रेक्षक बानीच्या यशाची कामना करतील. बानीची कहाणी या गोष्टीची आठवण करून देते की, जर कुटुंबाच्या प्रेमाची आणि महत्त्वाकांक्षेची साथ असेल, तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही आणि कोणताही अडथळा इतका मोठा नाही!

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…